रामायणातील ‘सीता’ दीपिका चिखलियाचा मॉडर्न अंदाज पाहून भडकले नेटकरी

| Updated on: Dec 30, 2022 | 2:42 PM

रामायणात सीतेची भूमिका साकारलेल्या दीपिका यांनी पोस्ट केला डान्सचा व्हिडीओ; भडकलेले नेटकरी म्हणाले 'हे काय करताय?'

रामायणातील सीता दीपिका चिखलियाचा मॉडर्न अंदाज पाहून भडकले नेटकरी
अभिनेत्री दीपिका चिखलिया
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली. या मालिकेमुळे त्यांना देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही प्रेक्षक त्यांच्या ‘माता सीता’ याच भूमिकेची आठवण काढतात. दीपिका या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे त्यांना नेटकरी ट्रोल करत आहेत.

दीपिका यांनी डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘ओ मेरे शोना’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. क्रीम कलरचा शरारा परिधान करून त्यांनी हा डान्स केला आहे. मात्र त्यांचा हा मॉडर्न अंदाज नेटकऱ्यांना आवडला नाही. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तर काहींनी त्यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो करणार असल्याचाही इशारा दिला.

हे सुद्धा वाचा

डान्सच्या या व्हिडीओमुळे दीपिका यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचं युजर्सनी म्हटलंय. ‘या वयात आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी गोष्ट का करताय’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. ‘सीतेच्या भूमिकेमुळे जो सन्मान तुम्हाला मिळाला, ते आवडलं नाही वाटतं’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने टीका केली. ‘तुम्हाला सर्वजण सीता मातेच्या रुपात पाहतात. कृपया अशा पद्धतीचे व्हिडीओ पोस्ट करू नका’, असंही एकाने लिहिलं.

दीपिका यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीता मातेची भूमिका साकारली होती. 1987 मध्ये दूरदर्शनवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर लॉकडाऊनदरम्यान 2020 मध्ये ही मालिका पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात आली होती.