मुंबई : दीपिका कक्कर हे टीव्ही मालिका क्षेत्रातील एक फेमस नाही आहे. दीपिका कक्कर (Dipika Kakar) हिने आपल्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दमदार अभिनय करताना नेहमीच दीपिका कक्कर ही दिसली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दीपिका कक्कर हिने 2018 मध्ये शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न (Marriage) केले. लग्नानंतरच दीपिका कक्कर फार काही मालिकांमध्ये दिसली नाही. ससुराल सिमर का अशा मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका करताना दीपिका कक्कर ही दिसली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही दीपिका कक्कर हिची बघायला मिळते.
दीपिका कक्कर आता लवकरच आई होणार आहे. शोएब इब्राहिम याच्या पहिल्या बाळाला दीपिका कक्कर जन्म देणार आहे. दीपिका कक्कर हिचे चाहते सतत तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. एक अंदाजा सातत्याने बांधला जात होता की, दीपिका कक्कर ही प्रेग्नसीनंतर मालिकांमध्ये पुनरागमन करेल.
नुकताच दीपिका कक्कर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीनंतर दीपिका कक्कर हिच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसलाय. या मुलाखतीमध्ये दीपिका कक्कर ही टीव्ही मालिकांमधील पुनरागमनावर बोलली आहे. दीपिका कक्कर हिने म्हटले की, ज्यावेळी मी आई होणार हे मला कळाले, त्याचवेळी मी शोएब याला बोलले.
पुढे दीपिका कक्कर म्हणाली की, मी शोएब याला म्हटले की मला आता काम करायचे नाही किंवा मी अभिनय करणार नाहीये. मला बाळाकडे लक्ष देत एका गृहिणीची भूमिका साकारायची आहे. म्हणजेच काय तर दीपिका कक्कर हिने आता स्पष्ट सांगितले आहे की, ती परत कधीच मोठ्या पडद्यावर दिसणार नाहीये.
दीपिका कक्कर हिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. दीपिका कक्कर ही परत कधीच मालिकेमध्ये दिसणार नसल्याने तिचे चाहते देखील निराश झाल्याचे बघायला मिळते. दीपिका कक्कर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ब्लाॅगमध्येही आपल्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे नेहमीच दीपिका कक्कर सांगते.
दीपिका कक्कर हिने 22 फेब्रुवारी 2018 ला इस्लाम धर्म स्वीकार करून शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, सुरूवातीला दीपिका हिने धर्मांतराची बाब लपवून ठेवली होती. धर्मांतर केल्यानंतर अनेकांच्या निशाण्यावर दीपिका कक्कर ही आली होती. विशेष म्हणजे दीपिका कक्कर ही बिग बाॅस 12 ची विजेती देखील आहे.