मुंबई : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी त्यांच्या यशराज फिल्म्स कंपनीमधून (Yash Raj Films) एका दिग्दर्शकाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत विविध चर्चा रंगल्या आहेत. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dwivedi) यांना आदित्य चोप्रा यांना प्रॉडक्शन हाऊसमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की द्विवेदी यांनी आदित्य चोप्राला कोणतीही पूर्व कल्पना न देता अक्षय कुमार बरोबर राम सेतु हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. (Director Chandra Prakash Dwivedi out of Yashraj Films Company)
अक्षयचा आगामी पृथ्वीराज चित्रपटाचे दिग्दर्शन द्विवेदी यांनीच केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, पण पुढील प्रक्रियेत द्विवेदी दिसणार नाहीत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ चित्रपटाचे स्क्रिप्ट डिस्कस केली होती, जी अक्षयला खूप आवडली आहे. यानंतर घाईघाईने द्विवेदी यांनी या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आणि अक्षयबरोबर हा चित्रपट करत असल्याची अधिकृत घोषणा केली.
आदित्य चोप्राशी कोणतीही चर्चा न करता द्विवेदी यांनी या चित्रपटाची घोषणा केली, यामुळे आदित्य चोप्राशी नाराज झाले आहेत आणि याच कारणामुळे आदित्य यांनी द्विवेदी यांना पृथ्वीराजमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांना श्रेय दिले जाईल. मात्र, त्यानंतर त्यांचा आणि यशराज फिल्म्स कंपनीचा यापुढे कोणताही संबंध नसणार आहे.
संबंधित बातम्या :
सोहेल खान, त्यांचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानविरोधात FIR; काय आहे नेमकं प्रकरण?
(Director Chandra Prakash Dwivedi out of Yashraj Films Company)