मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Director mahesh manjarekar) यांचा पांघरुण (panghrun) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले आहेत. झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात पहायला मिळेल.
आता प्रतिक्षा संपली… घेऊन येतोय ‘पांघरूण’ आणखी लवकर…
साक्षीदार व्हा एका संगीतमय, विलक्षण प्रेमकहाणीचे! ४ फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.#MaheshManjrekarMovies @manjrekarmahesh@gauri_ingawale @amolbawdekar @bappajoshi27 @rohitphalke1010 @vaibhavjoshee pic.twitter.com/aFkCWsSrlC— Zee Studios (@ZeeStudios_) January 19, 2022
पुरस्कारांची लयलूट करणारा चित्रपट
28 व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने मानाचं स्थान मिळवलं. तसंच अनेक पुरस्कार आपल्या नावे केले.
चित्रपटातल्या गाण्यांची जादू
पांघरुण चित्रपट जरी अजून प्रदर्शित झाला नसला तरी त्याची गाणी मात्र तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतील. या गाण्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच सिनेरसिकांच्या मनात घर केलंय. ‘ही अनोखी गाठ कोणी बांधली’, ‘सतरंगी झाला रे’, ‘इलुसा हा देह’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
या सिनेमाने अनेक पुरस्कार प्राप्त केलेत. यातली गाणी मनाला मोहिनी घालताहेत. 4 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या