मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड विश्वातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्रेक्षकांना आवडतात, तर काही व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजलेली असते. एवढंच नाही व्हायरल व्हिडीओमुळे अनेक सेलिब्रिटींना ट्रोलिंकचा सामना करावा लागत आहे. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या बहिणीचा आहे. प्रियांका चोप्रा हिची बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिने ‘जिद’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या मन्नारा दाक्षिणात्य सिनेविश्वात सक्रिय आहे. सध्या सर्वत्र प्रियांका चोप्रा हिच्या बहिणीची चर्चा रंगत आहे.
मन्नारा चोप्रा सध्या टॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका चोप्राची चुलत बहीण मनारा चोप्रा हिने २०१४ साली तेलुगू अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या मन्नारा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक रवीकुमार चौधरी यांनी ‘तिरगाबादरा सामी’च्या पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्रीच्या गालावर किस केलं.
#PriyankaChopra’s cousin, actress #Mannarachopra gets kissed by director AS Ravikumar in front of the media! #TiragabadaraSaamipic.twitter.com/54w5JHvjIv
— Ajay AJ (@AjayTweets07) August 29, 2023
व्हिडीओमध्ये अभिनेत्री दिग्दर्शक रवीकुमार चौधरी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. पण पोज देत असताना रवीकुमार चौधरी यांनी अभिनेत्रीला सर्वांसमोर गालावर किस केलं.. ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ माजली आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
दिग्दर्शकाने किस केल्यानंतर अभिनेत्रीला देखील असहज वाटत होतं. पण मीडियासमोर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली नाही आणि हसताना दिसली. सध्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंटकरत प्रतिक्रिया दिली आहे. पण मन्नारा आणि रवीकुमार चौधरी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मन्नारा चोप्रा ही प्रियांका चोप्रा हिची चुलत बहीण आहे. मन्नारा हिच्यापूर्वी देसी गर्लेची बहीण परिणीती चोप्रा हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या परिणीती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. परिणीती लवकरच माजी खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या सर्वत्र प्रियांका आणि तिच्या बहिणींची चर्चा रंगत आहे.