महाकुंभ गर्ल मोनालिसाला सिनेमाची ऑफर करण्याऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक

| Updated on: Mar 31, 2025 | 3:51 PM

महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच सिनेमामध्ये दिसणार आहे. पण तिला ज्या दिग्दर्शकाने सिनेमाची ऑफर दिली त्याला बलात्कार प्रकरणात अटक झाली आहे.

महाकुंभ गर्ल मोनालिसाला सिनेमाची ऑफर करण्याऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक
Sanoj Mishara
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

महाकुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणी त्याला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीच्या नबी करीम पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एका छोट्या शहरातील मुलीने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याची आशा सनोज मिश्राने तिला दाखवली होती. पण या दरम्यान सनोजने त्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

अंमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप

पीडितेच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये तिची सनोज मिश्रासोबत टिकटॉक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यावेळी ती झाशी येथे राहत होती. दोघांमध्ये काही काळ संभाषण सुरू राहिले आणि त्यानंतर 17 जून 2021 रोजी दिग्दर्शकाने तिला फोन करून झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्याचे सांगितले. पीडितेने सामाजिक दबावाचे कारण देत भेटण्यास नकार दिल्यावर आरोपी सनोज मिश्रा याने आत्महत्येची धमकी दिली. यानंतर घाबरून पीडित तरुणी त्याला भेटायला गेली. दुसऱ्या दिवशी 18 जून 2021 रोजी आरोपीने पुन्हा फोन करून तिला आत्महत्येची धमकी देऊन रेल्वे स्टेशनवर बोलावले.

हे सुद्धा वाचा

वाचा: ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत

तेथून आरोपीने तिला एका रिसॉर्टमध्ये नेले आणि नशेचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ बनवले. त्यानंतर धमकी दिली की जर तिने विरोध केला तर ते व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करेल. यानंतर त्याने तिला लग्नाच्या बहाण्याने अनेक ठिकाणी बोलावून शारीरिक संबंध ठेवले. याशिवाय तिला चित्रपटात काम देण्याचे आमिषही दाखवले होते.

महाकुंभमध्ये फुले विकणारी मोनालिसा सोशल मीडियावर तुफान चर्चेत होती. तिला सनोज मिश्राने चित्रपटाची ऑफर दिली होती. त्याने तिला ‘द डायरी ऑफ 2025’ या चित्रपटात कास्ट करण्याची घोषणा केली होती. अशीही बातमी आली होती की, सनोज मिश्रा मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षणही देत ​​आहेत आणि तिला काही ठिकाणी सोबत घेऊन जात आहेत.