मुली म्हणजे बापाचा गर्व… मोठी मुलगी करतेय देशाची सेवा, छोटी करतेय बॉलिवूडवर राज्य

| Updated on: Aug 30, 2024 | 1:18 PM

Father Daughter Love: पोलीस खात्यात वडिलांनी कमावलं नाव, लहान मुलीचा बॉलिवूडमध्ये बोलबाला, तर मोठी मुलगी मेजर म्हणून करतेय देशाची सेवा..., सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते 'या' बहिणींची चर्चा...

मुली म्हणजे बापाचा गर्व... मोठी मुलगी करतेय देशाची सेवा, छोटी करतेय बॉलिवूडवर राज्य
Follow us on

मुली मुलांपेक्षा कमी नसतात… असं कायम म्हटलं जातं. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मुलींचा गर्व आणि अभिमान प्रत्येक बापाला असतो. अशात दोन बहिणी आहेत, त्यातील मोठी बहीणी देशाची सेवा करत आहे, तर दुसरी बहीण बॉलिवूडवर राज्य करत आहे. सध्या जी अभिनेत्री आणि तिच्या बहिणीची चर्चा सुरु आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री दिशा पटानी आहे. दिशा बॉलिवूड राज्य करत आहे. तर अभिनेत्री मोठी बहीण खुश्बू पटानी ही देशाची सेवा करत आहे.

खुश्बू आणि दिशा यांच्या वडिलांचं नाव जगदीश सिंग पटानी असं आहे. जगदीश सिंग पटानी हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. तर त्यांना त्यांच्या मुलींच्या यशाचा गर्व वाटतो. एका मुलाखतीत जगदीश सिंग पटानी म्हणाले, ‘मुलींना मिळालेल्या यशानंतर मला प्रचंड आनंद वाटतो. सुरुवातील ते त्यांत्या पोलीस खात्यातील कामामुळे ओळखले जायचे. आता जगदीश सिंग पटानी मुलींच्या कामामुळे ओळखले जातात. ‘माझ्या दोन्ही मुलींच्या यशाचा सन्मान करतो…’ असं देखील जगदीश सिंग पटानी म्हणाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी

दिशा पटानी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘लोफर’ सिनेमातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात देखील दिशा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. सिनेमामुळे दिशाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज दिशा बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत आहे.

 

 

खुश्बू पटानी: भारतीय लष्करातील एक अभिमानास्पद मेजर

दिशाची मोठी बहीण खुश्बू पटानी या अभ्यासात प्रचंड हुशार होत्या. खुश्बू शाळा – कॉलेजमध्ये कायम अव्वल असायच्या. कॉलेजमध्ये असताना खुश्बू यांना नोकरीची देखील ऑफर होती. पण त्यांनी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मेहनत करून स्वप्न पूर्ण केलं.

 

 

खुश्बू यांची निवड भारतीय सेनेमध्ये झाली. देशाची सेवा करत अताना हळू-हळू खुशी पटानी सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन आणि आता मेजर म्हणून देशाची सेवा करत आहे. खुशी पटानी आता सध्या मिझोराम याठिकाणी स्वतःचं कर्तव्य बजावत आहेत.