Disha Patani पुन्हा ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीसोबत स्पॉट; दोघांमध्ये नक्की सुरु तरी काय?

| Updated on: Jul 02, 2023 | 10:01 AM

अनेक वर्षांनंतर दिशा पटानी पुन्हा प्रसिद्ध व्यक्तीसोबत स्पॉट; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल दोघांमध्ये नक्की कोणतं नातं? सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा..

Disha Patani पुन्हा या प्रसिद्ध व्यक्तीसोबत स्पॉट; दोघांमध्ये नक्की सुरु तरी काय?
Follow us on

मुंबई | अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी दिशा तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिशा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. पण यावेळी चाहत्यांच्या नजरा दिशा हिच्या सौंदर्यावर नाही तर, अभिनेत्रीसोबत असलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तीवर येवून थांबल्या. अनेक वर्षांनंतर दिशा पटानी पुन्हा प्रसिद्ध व्यक्तीसोबत स्पॉट झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, दोघांमध्ये नक्की नातं काय आहे? अशा चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.

यावेळी दिशा स्पॉट झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती अभिनेता टायगर श्रॉफ आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. एवढंच नाही तर, दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं होतं. पण जेव्हा दिशा आणि टायगर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या तेव्हा चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण अनेक वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना आनंद झाला आहे, अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

 

दिशा आणि टायगर यांना दिल्ली विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. दिल्लीमध्ये दोघे एका कार्यक्रमासाठी आले होते. दोघांनी मॅट्रिक फाइट नाइटचा आनंद घेतला. यावेळी दिशा आणि टायगर यांच्यासोबत जॉकी श्रॉफ याची मुलगी कृष्णा श्रॉफ देखील होती. सध्या सर्वत्र तिघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय दिशा आणि टायगर पुन्हा एकत्र आले आहेत.

एवढंच नाही तर, टायगर याने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताना एक्स – गर्लफ्रेंडसोबत जुना फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामुळे देखील दोघांच्या नात्याच्या सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्तसाधत अभिनेत्याने खास फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘‘येणारा काळ हा आनंददायी असेल… असं कायम प्रेम आणि आनंद सर्वांसोबत वाटत राहा… वाढदिवसाच्या शुभेच्छा @dishapatani’…’ असं लिहिलं होतं.

दिशा आणि टायगर यांच्या नात्यावर जॉकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

टायगर श्रॉफच्या मुलाच्या ब्रेकअपच्या प्रतिक्रिया देताना म्हणाले, दिशा-टायगर नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रयव्हसीमध्ये जास्त पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात… सध्या सर्वत्र दिशा आणि टायगर यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.