अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या ‘योद्धा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिशाने पहिल्यांदाच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला आहे. एकीकडे दिशा तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असताना दुसरीकडे तिची मोठी बहीण खुशबू पटानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिशाची बहीण खुशबू ही इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट आहे. नुकताच तिचा एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. दिशाप्रमाणेच तिची बहीणसुद्धा फिटनेस फ्रिक आहे. सकाळी डान्स करणं हासुद्धा चांगला वर्कआऊट होऊ शकतो, असं म्हणत तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. खुशबूचा हा व्हिडीओ काहींना आवडला तर काहींनी त्यावरून टीका करण्यास सुरुवात केली.
‘डान्स हा वर्कआऊटचा चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला तर जिम जायला, धावायला किंवा कोणतंही स्पोर्ट्स आवडत नसेल तर डान्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. याने फक्त तुमच्या शरीरात ऊर्जा येत नाही तर तुमचं मनसुद्धा प्रसन्न होतं. आपल्या आवडत्या गाण्यावर 15 मिनिटांपर्यंत डान्स करा’, असं लिहित खुशबूने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने डान्समुळे किती कॅलरी कमी होऊ शकतात, त्याचाही हिशोब सांगितला आहे. ‘तुमच्या क्षमतेनुसार जर 15 ते 20 मिनिटांपर्यंत डान्स केला तर 100 हून अधिक कॅलरी कमी होऊ शकतात’, असं तिने म्हटलंय. खुशबूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘ही तिची बहीण दिशासारखीच आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘दोघी बहिणींना कपड्यांची ॲलर्जी आहे वाटतं’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘दिशासारखीच हीसुद्धा अंगप्रदर्शन करतेय’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. दिशा अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिचा बोल्ड अंदाज काहींना पसंत येत नाही. त्यामुळे खुशबूलाही या व्हिडीओमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
दिशा जरी बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिची बहीण बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून लांबच राहते. मात्र दिसायला ती दिशाइतकीच ग्लॅमरस असल्याचं पहायला मिळतं. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा खुशबूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. खूशबू आणि दिशाला एक छोटा भाऊसुद्धा आहे. त्याचं नाव सुर्यांश पटानी असं आहे. दिशा आणि खुशबूचे वडील जगदीश सिंह पटानी हे पोलिसांत डीएसपी रेंजचे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रभावामुळेच खुशबूने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं.