बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी अभिनयासोबतच तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता तिनं अनोख्या अंदाजात काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एवढंच नाही तर ती नेहमी प्राण्यांसोबतचही फोटो शेअर करत असते.
आता तिनं रेडकूसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तिच्या या फोटोंमधून तिचं प्राणी प्रेम दिसून येतंय.
नुकतीच अशी बातमी आली होती की, लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशाने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
आपल्या बोल्ड स्टाईलने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.