मुंबई : अनेकदा असं घडतं जेव्हा आपण एखादा रोमँटिक चित्रपट किंवा गाणं ऐकतो तेव्हा आपण त्यात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. तो चित्रपट किंवा त्या गाण्यांची तुलना आपण स्वतःशी करायला सुरुवात करतो. आता अशीच एक शॉर्ट फिल्म आपल्या भेटीला आली आहे, ज्यासोबत तुम्ही नक्कीच स्वत:ला कनेक्ट कराल. दिग्दर्शक शशांक शेखर सिंह (Shashank Shekhar Singh) यांच्या ‘दोबारा अलविदा’ (Dobara Alvida) या शॉर्ट फिल्मबद्दल आम्ही बोलत आहोत. ही शॉर्ट फिल्म आज म्हणजेच 8 जून रोजी यू ट्यूब चॅनेल लार्ज शॉर्ट फिल्म्सवर रिलीज झाली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये स्वरा भास्कर(Swara Bhaskar), गुलशन देवय्या (Gulshan Devaiah) आणि स्वप्निल (Swapnil) मुख्य भूमिकेत आहेत.
या रोमँटिक शॉर्ट फिल्मची निर्मिती टीम वन एंटरटेन्मेंटनं केली आहे. या शॉर्ट फिल्मवर अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे, मात्र आता ही शॉर्टफिल्म यूट्यूबच्या माध्यमातून देश आणि जगातील लोकांच्या मनावर राज्य करणार आहे. रोमँटिक शॉर्ट फिल्मबद्दल आम्ही चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी आणि कलाकारांशी खास संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे शशांकनं या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या मुलाखतीत शशांकनं चित्रपटाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.
काय आहे चित्रपटाची कहाणी?
या शॉर्ट फिल्मची एक खास गोष्ट म्हणजे त्यात एक गाणं देखील आहे. स्वारा, गुलशन आणि स्वानिल असे तीन लोक या शॉर्ट फिल्ममध्ये आहेत. स्वप्निल हा कॅब ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. तर स्वरा आणि गुलशनला एक कपल म्हणून दाखवण्यात आलं आहे. हे कपल म्हणजे एक्स गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड हे अनेक वर्षांनंतर अचानक भेटतात. अवघ्या काही मिनिटांच्या भेटीत ते आपले जुने क्षण पूर्णपणे जगतात. गाण्याच्या माध्यमातून ही स्टोरी पुढे जाते, सोबतच ती अधिक मनोरंजक होते.
दिग्दर्शक शशांकच्या नजरेतून जाणून घ्या ‘दोबारा जिंदगी’ बद्दल …
शशांक म्हणाला- ‘अनेक लोक या शॉर्ट फिल्मला स्वत:शी कनेक्ट करतील. विशेषत: ते लोक, ज्यांचे पूर्वी काही संबंध होते. यात फक्त तीन पात्र आहेत. याशिवाय कलाकारांमध्ये दुसरं कोणीही नाही. सोबतच या शॉर्ट फिल्ममध्ये एक अतिशय सुंदर गाणं आहे. शॉर्ट फिल्ममध्ये एखादं गाणं असणं हे फार कमीवेळा आढळतं. संगीत दिग्दर्शक कृष्णा यांनी हे गाणं दिलं आहे. या गाण्याला त्यांनी आवाजही दिला आहे.
दोबारा जिंदगीच्या टायटल ट्रॅकवर बोलताना शशांक म्हणाला – मला असं एक रोमँटिक आणि भावनिक शॉर्ट फिल्म बनवायची होती ज्यात एक गाणं असेल. जे त्या रोमँटिक आणि भावनिक भावनांचं वर्णन अगदी सुंदरपणे करेल.
या चित्रपटाला मानस मित्तल यांनी एडिट केलं आहे. त्यांनी प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर अभिनीत ‘द स्काई इज पिंक’, व्योमकेश बक्षी यांचा ‘परी’ या चित्रपटांचं एडिट केलं आहे. या दरम्यान, शशांकनं दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना आलेल्या काही अडचणींबद्दलही सांगितलं. त्यानं सांगितलं की चार वेळा चित्रपटाचं शूटिंग कोणत्या ना कोणत्या कारणामुळे थांबलं. त्यावेळी मनात हा विचार आला की कदाचित हे काम पूर्ण होणार नाही. पण शशांकनं धैर्यानं काम केलं आणि सर्व समस्यांशी झुंज देत ही शॉर्टफिल्म तयार केली.
कलाकारांमध्ये हवे होते नवीन चेहरे
चित्रपटाच्या कलाकारांविषयी शशांकनं सांगितलं की त्याला एक फीचर फिल्म तयार करायची होती तेव्हा त्यानं गुलशनला संपर्क साधला होता. मात्र काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. यानंतर ही नवी शॉर्ट फिल्म बनवण्याची कल्पना त्याच्या मनात आली. त्यानं गुलशनशी परत संपर्क साधला आणि त्याला ही कहाणी आवडली. शशांकच्या मते स्वरा भास्कर ही त्याची मैत्रीण आहे. जेव्हा त्यानं स्वराला ही गोष्ट सांगितली, तेव्हा तिनंही लगेच होकार दिला.
स्वरा आणि गुलशनला पडद्यावर जोडी म्हणून दाखवण्याच्या विषयावर शशांक म्हणाला की, त्याला नवीन चेहरे हवे होते, मात्र ज्यांना प्रेक्षक ओळखतात असे. स्वरा आणि गुलशनची जोडी यापूर्वी कधीही पडद्यावर दिसली नव्हती, म्हणूनच शशांकला या रोमँटिक शॉर्ट फिल्मसाठी एक परिपूर्ण जोडी मिळाली. तो म्हणाला की स्वरा, गुलशन, कृष्णा आणि मानस यासारख्या मोठ्या नावांनी माझ्या शॉर्टफिल्मला पाठिंबा दर्शवला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
संबंधित बातम्या
Devmanus : देवमाणसाला शिक्षा द्यायला नव्या ‘मॅडम’ची एन्ट्री, पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री
Photo : नोरा फतेहीचं अनोख्या कपड्यांमध्ये फोटोशूट, चाहते म्हणाले रणवीर सिंगला सोडलं मागे…
Photo : ‘मिलियन डॉलर व्हेगन’ संस्थेने भारतातील गरजूंची भूक भागवली, सनी लिओनीचा विशेष सहभाग