मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | ‘हम आपके है कोन’, ‘देवदास’, ‘आजा नचले’, ‘दिल’, ‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘दिल को पागल है’ अशा एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत फक्त आणि फक्त माधुरी हिची चर्चा रंगलेली असायची. माधुरी हिचा नवा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची चित्रपटगृहाबाहेर गर्दी असायची. माधुरी हिची लोकप्रियता प्रचंड मोठी होती. त्यामुळे तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. पण यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने डॉक्टर श्रीराम यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नापूर्वी माधुरी हिच्याबद्दल मोठं सत्य नेने यांना माहिती नव्हतं… ते रहस्य नक्की कोणतं होतं ते जाणून घेवू…
माधुरी दीक्षित हिचे पती डॉ. श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवॅस्कुलर सर्जन आहेत. माधुरी आणि नेने यांची पहिली भेट अमेरिकेतच झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षित हिचा भाऊ अजित दीक्षित यांच्या एका पार्टीत डॉ. नेने आणि माधुरी दीक्षित पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं…
माधुरी हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘नेने यांना माहिती नव्हतं की मी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.’ एका सामान्य मुली प्रमाणे माधुरी डॉक्टर नेने यांना भेटण्यासाठी गेली होती. माधुरी हिचा हाच साधेपणा नेने यांना प्रचंड आवडला आणि त्यांनी माधुली हिला लग्नासाठी मागणी घातली. १७ ऑक्टोबर १९९९ साली अत्यंत साध्या पद्धतीत नेने आणि माधुरी यांचं लग्न झालं.
माधुरी हिच्या लग्नाची माहिती बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींना कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. कारण फक्त कुटुंबियांच्या उपस्थित लग्नसोहळा पार पडला होता. पण मुंबईत रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माधुरी आणि नेने यांच्या रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिलेल्या दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटींपैकी डॉ. नेने फक्त महानायक अमिताभ बच्चन यांनाच ओळखू शकले. आपल्या रिसेप्शन सोहळ्यात बिग बी उपस्थित राहिल्यानंतर नेने यांना कळलं माधुरी बॉलिलूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माधुरी बॉलिवूडची लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे… हे सत्य नेने यांना लग्नानंतर कळलं…