बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदाने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. सध्या गोविंदाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. आज सकाळी चुकीने गोविंदाच्या पायाला गोळी लागली. ज्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. आता गोविंदाच्या पायातील गोळी ही डॉक्टरांनी काढली आहे. नुकताच आता गोविंदा याच्याबद्दल अत्यंत मोठे हेल्थ अपडेट येताना दिसत आहे.
गोविंदा याच्या पायाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर रमेश अग्रवाल यांनी सांगितले की, गोविंदाच्या पायाला गुडघ्याच्या खाली गोळी लागली होती, गोळी काढण्यात आली आहे. गोविंदाच्या पायाला सुमारे 8 टाके पडले असून त्याला 3 ते 4 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. गोळी लागल्यानंतर त्याला अवघ्या काही वेळातच रूग्णालयात दाखल करण्यात आले.
गोविंदा यांना गुडघ्याच्या खाली दोन इंच गोळी लागलेली आहे. आता गोविंदाला लागलेली गोळी पोलिसांनी जप्त केलीये. फक्त गोळीच नाही तर गोविंदाची बंदुकही पोलिसांकडून जप्त करण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणात तपास हा सुरू केलाय. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात सध्या गोविंदावर उपचार हे सुरू आहेत.