राधिका मर्चंट, कियारा आडवाणी, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांच्या सर्वांच्या लग्नात एका गोष्ट कोणती कॉमन होती? तुम्ही विचार कराल डिझानर, मेकअर आर्टिस्ट, पदार्थ, गेस्ट लिस्ट, किंव मग सजावट… या गोष्टी असतील कॉमन.. पण नाही सर्व सेलिब्रिटींच्या लग्नात एक कॉमन गोष्ट नाही तर, एका महिला होती, जी सेलिब्रिटींना वेग-वेगळ्या पद्धतीत साडी नेसते आणि त्या महिलेचं नाव आहे डॉली जैन… सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये असंख्या मेकअप आर्टिस्ट, डिझायनर आहेत… पण सेलिब्रिटींना साडी नेसवणारी महिली एकच आहे आणि ती महिला म्हणजे डॉली जैन…
डॉली यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं लग्न एका सर्वसामान्य घरात झालं होतं. त्यामुळे त्यांना रोज साडी नेसावी लागत होती. सासूबाईंचा हट्ट असायचा सूनेने रोज साडी नेसलीच पाहिजे… डॉली यांच्या सासूबाईंनुसार सूनेला साडी नेसण्यासाठी रोज 45 मिनिटं लागतात. म्हणून डॉली यांना रोज सासूबाईंची बोलण ऐकावी लागत होती.
सासूबाईंचा साडी नेसण्यासाठीचा हट्ट आणि साडीचा डॉली यांना तिरस्कार होऊ लागला होता. पण डॉली यांनी विचार केला जसे त्यांचे हाल होत आहेत, तसेच इतर महिलांचे देखील होत असतील, त्यामुळे डॉली यांनी स्वतःची अडचण कलेत बदलली त्यानंतर प्रोफेशनमध्ये… तेव्हा 45 मिनिटं साडी नेसण्यासाठी घेणाऱ्या डॉली आता 18 सेकेंडमध्ये वेग-वेगळ्या पद्धतीत साडी नेसवू शकतात.
डॉली म्हणाल्या होत्या, ‘महिला काहीही करु शकतात. जेव्हा मी साडी ड्रेपिंगचं काम सुरु केलं. तेव्हा लोकं मला म्हणाली काय पागल बाई आहे. साडी नेसवून कोणी श्रीमंत होणार आहे का? पण आत तुम्ही मला पाहू शकता. मी यशाच्या शिखरावर आहे…’
‘मी एका लग्ना नवरीला भरजडीत ओढणी लावण्यासाठी मदत करत होती, तेव्हा डिझायनर अबू जानी – संदीप खोसला यांनी माझं काम पाहिलं आणि ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी सेलिब्रिटींना माझ्याबद्दल सांगायची सुरुवात केली. पण जेव्हा मी अभिनेत्री श्रीदेवी यांनी साडी नेसवली तेव्हा ते मला म्हणाले तुझ्याकडे एक जादू आहे… ती जादू मला प्रोफेशनमध्ये बदलायला हवी… तेव्हा मी काम करण्याचा निर्यण घेतला…’ असं देखील डॉली म्हणाल्या…
डॉली यांनी केलेल्या दाव्यानुसार, डॉली एक साडी 325 वेग-वेगळ्या लूकमध्ये नेसवू शकतात. साडी 325 वेगळ्या प्रकारे नेसवू शकते हे आवश्यक नाही, महत्त्वाचे एकच साडी 325 दिवस वेग-वेगळ्या लूकमध्या दिसू शकते. आज डॉली सेलिब्रिटींना साडी नेसवून लाखो रुपये कमावतात.