The Kerala Story चित्रपटावरुन पुन्हा एकदा वाद, प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

| Updated on: Apr 05, 2024 | 10:50 AM

The Kerala Story : ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट वादग्रस्त ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट हिट ठरला. पण आता वर्षभराने पुन्हा एकदा या चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. हिंदू मुलींना कशा पद्धतीने फसवून कट्टरपंथीय प्रदेशात नेलं जातं, ते या चित्रपटात दाखवलं आहे.

The Kerala Story चित्रपटावरुन पुन्हा एकदा वाद, प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी
The Kerala Story
Follow us on

पब्लिक ब्रॉडकास्टर दूरदर्शनवर ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटावरुन बरेच वाद, विवाद झाले होते. हिंदू मुलींना कशा पद्धतीने फसवून कट्टरपंथीय प्रदेशात नेलं जातं, ते या चित्रपटात दाखवलं आहे. हा चित्रपट हिट ठरला. पण त्यावरुन बरीच मत-मतांतर आहेत. वाद देखील झाले. आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दूरदर्शनवर ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्याला विरोध केला आहे. सीएम विजयन यांनी दूरदर्शनला या चित्रपटाच स्क्रीनिंग रोखण्यास सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवल्यास सांप्रदायिक तणाव वाढू शकतो, असं त्यांनी म्हटलं. अशा चित्रपटाच स्क्रीनिंग ब्रॉडकास्टरनी करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका सुद्धा केली. दूरदर्शनने भाजपा आणि आरएसएसची प्रचार यंत्रणा बनू नये, असं केरळचे मुख्यमंत्री म्हणाले.

“‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट समाजात दुही निर्माण करणारा आहे. या चित्रपटाच प्रदर्शन करण्याचा दूरदर्शनाचा निर्णय निंदनीय आहे. दूरदर्शनने भाजपा आणि आरएसएसची प्रचार मशीन बनू नये. अशा चित्रपटाच्या स्क्रीनिंगपासून माघार घेतली पाहिजे. अशा चित्रपटांमुळे फक्त स्थिती बिघडू शकते. लोकसभा निवडणुकीआधी सांप्रदायिक तणाव वाढू शकतो” असं मुख्यमंत्री विजयन यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.


दूरदर्शनवर कधी दाखवला जाणार ‘द केरल स्टोरी’ चित्रपट?

आज म्हणजे शुक्रवारी रात्री 8 वाजता ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दूरदर्शनवर दाखवला जाणार आहे. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी रिलीज झाला होता. त्यावेळी सुद्धा राज्यातील लेफ्ट पार्टीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध केला होता.