मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ (Tarak Mehta ka Ulta Chashma) या मालिकेची लोकप्रियता पाहून या मालिकेचे मेकर्स प्रेक्षकांसाठी याचे अॅनिमेटेड व्हर्जन घेऊन आले आहेत. ‘तारक मेहता का छोटा चश्मा’ (Tarak Mehta ka Chota Chashma) असं या शोचं नाव आहे. हा शो खास लहान मुलांसाठी डिझाइन केलेला आहे. उद्यापासून म्हणजेच 19 एप्रिलपासून तारक मेहता का छोटा चश्मा प्रसारित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. हा शो सोनीने मुलांसाठी तयार केलेल्या सोनी याय (Sony Yay) चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
ट्विटर अकाउंटवरुन दिली माहिती
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या शोचे महत्त्वाचे पात्र पत्रकार पोपटलाल शोच्या अॅनिमेटेड व्हर्जनची माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पोपटलाल सांगतात – प्रिय दर्शकांनो, आम्ही तुमच्यासाठी तारक मेहता का छोटा चश्मा हा आणखी एक मनोरंजन कार्यक्रम घेऊन येत आहोत.
Agar humari tarah aap bhi dil se bacche ho, toh #TMKOC ke Animated roop se milo.
Ab dekhiye #TaarakMehtaKaOoltahChashmah as #TaarakMehtaKkaChhotaChashmah, 19th April se Monday to Friday at 11:30 am only on @SonyYAY!@AsitKumarrModi @TMKCC pic.twitter.com/A0WhYWAqRJ— Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (@TMKOC_NTF) April 17, 2021
हा शो प्रेक्षकांना कुठे आणि कधी बघता येईल?
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की- “तारक मेहताचा छोटा चश्मा 19 एप्रिल सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता फक्त सोनी याय (Sony Yay) चॅनेलवर पाहा.”
पाहा व्हिडीओ
नुकतंच या शोचं टायटल ट्रॅक लाँच करण्यात आलं, ज्यामध्ये पात्रांच्या आश्चर्यकारक गोष्टी दर्शविल्या गेल्या आहेत. हा ट्रॅक तारक मेहता का उल्टा चष्माचा प्रवास दाखवतो. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत गोकुलधाम सोसायटीचा नवीन अवतार दाखवल्या जाणार आहे. सोबतच हा शो प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने स्वत:चं एक मजबूत ब्रँड तयार केलं आहे. शोमध्ये कौटुंबिक समस्या सोडवण्याचा योग्य मार्ग सांगितला जातो, मैत्री कशी जपावी हे ही प्रेक्षक शिकत आहेत. या मालिकेमध्ये गोष्टींच्या रुपात अनेक वेळा सामाजिक विषयांवर भाष्य केलं जातं.
संबंधित बातम्या
Birth Anniversary: मोठ्या पडद्यावरील कजाग सासू, प्रेमळ आई… एक होत्या ललिता पवार; वाचा संपूर्ण प्रवास