सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकतानाचा व्हिडीओ समोर

| Updated on: Dec 06, 2023 | 1:23 PM

अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत मुंबईतल्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याची ही अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सनी देओल अशा अवस्थेत रस्त्यावर का फिरतोय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकतानाचा व्हिडीओ समोर
Sunny Deol
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 6 डिसेंबर 2023 | सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होण्यास फार अवधी लागत नाही. त्यातही तो फोटो किंवा व्हिडीओ एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा किंवा सेलिब्रिटीचा असेल तर वाऱ्याच्या वेगाने तो पसरतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेता सनी देओलचा आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओलची अवस्था पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. कारण मुंबईतील जुहू सर्कल परिसरात तो चक्क मद्यधुंद अवस्थेत पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध तो अडखळत चालतोय आणि अचानक एक रिक्षाचालक त्याच्या मदतीला येतो. हा रिक्षाचालक सनीला त्याच्या रिक्षामध्ये बसवतो आणि हे सर्व घडत असताना तो मद्यधुंद अवस्थेतच असल्याचं पहायला मिळत आहे.

सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘सनी पाजी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर का फिरत आहेत’, असा सवाल एकाने केला. तर ‘कदाचित हा डीपफेक व्हिडीओ असू शकतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘बॉबीच्या यशाचा सदमा असेल’, अशी उपरोधिक टिप्पणीही नेटकऱ्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

सनी देओलच्या या व्हायरल व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सनी त्याच्या आगामी ‘सफर’ या चित्रपटासाठी विविध शहरांमध्ये शूटिंग करत आहे. त्यामुळे त्याच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं कळतंय. सनीने त्याच्या आधीच्या मुलाखतींमध्येही हे स्पष्ट केलंय, की तो मद्यपान करत नाही.

‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या या मुलाखतीत सनी म्हणाला होता, “असं नाहीये की मी दारू प्यायलोच नाही. जेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा समाजाचा एक भाग होण्यासाठी मी दारू प्यायला होतो. एक तर ती इतकी कडू, त्यात तिचा इतका दुर्गंध, प्यायलानंतर डोकं सुद्धा दुखायला लागतं, तरी ते लोकांना इतकं का आवडतं हे मला समजत नाही. म्हणूनच मला दारू कधीच आवडली नाही.”