उर्फी जावेद हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार कठीण आहे. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टीका देखील केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा परिणाम हा कधीच उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. मुंबईमध्ये आल्यावर आपल्याकडे राहण्यासाठी देखील जागा नसल्याचे सांगताना उर्फी जावेद दिसली होती.
उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद नुकताच स्पॉट झाली. यावेळी उर्फी जावेद ही थेट नशेत होती. यावेळी फोटोसाठी पोझ देताना उर्फी जावेद दिसली. पापाराझी हे फोटोसाठी उर्फी जावेदला थांबण्यास सांगत होते, त्यावेळी उर्फी जावेद थेट म्हणते की, बस झाले…खूप जास्त पिली आहे मी जाऊद्या…
हेच नाहीतर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेदला व्यवस्थित चालता येत नसल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे. आता उर्फी जावेदचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिला कमी पिण्याचा सल्ला देताना देखील दिसत आहेत. हेच नाहीतर अनेकांनी म्हटले की, किमान दारू पिवून तरी फोटोसाठी पोझ देऊ नको. अनेकांनी उर्फी जावेदवर टीका देखील केली.
मध्यंतरी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, उर्फी जावेद आणि ऑरी हे लग्न करणार आहेत. हेच नाहीतर पापाराझी हे थेट ऑरीला विचारतात की, तु उर्फी जावेदसोबत लग्न करणार आहेस का? यावर ऑरी म्हणतो की, हो…का नाही? हेच नाहीतर यावेळी उर्फी जावेद देखील लग्नाला होकार देते. मात्र, दोघेही फक्त मजाक करत होते. दोघे चांगले मित्र आहेत.
उर्फी जावेद आणि ऑरी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या फोटोंनंतर उर्फी जावेद आणि ऑरी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. ऑरी देखील नेहमीच चर्चेत असतो. उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा पैसा कमावते, हेच नाहीतर चित्रपटांमध्येही उर्फी जावेद काम करणार असल्याची एक चर्चा होती.