मुंबई | 29 जुलै 2023 : टीव्हीपासून ते बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta)आणि अभिनेता वत्सल सेठ (Vatsal Seth) हे कपल सध्या खूप खुश आहे. ते दोघेही नुकतेच आई-बाबा बनल्याने ते चर्चेत आहेत. ‘दृश्यम’ फेम अभिनेत्रीने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला असून बाळाच्या येण्याने इशिता आणि वत्सल दोघांचही आयुष्य बदललं आहे.
खरंतर हा बदल प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यात येतोच. नुकताच वत्सलने एक व्हिडीओ शेअर केला असून आपली रात्रीची झोप उडाल्याचे नमूद केले आहे.
इशिता आणि त्याच्या मुलाचा व्हिडिओ पोस्ट करत वत्सल म्हणाला आहे की, आता त्याला रात्री साडेतीन वाजेपर्यंत जागे राहावे लागत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कारण समजले असेलच. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इशिता आपल्या मुलाला रात्री झोपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी वत्सलही जागा राहून हा क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहे. दोघांचीही अवस्था बिकट झाल्याचे दिसत आहे.
शइता आणि वत्सल दोघेही प्रचंड थकल्याचे आणि त्यांना खूप झोप येत असल्याचेही त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे. पण आता बाळासाठी त्यांना जागे रहावे लागणारच आहे. लग्नाच्या सहा वर्षआनंतर इशिता आणि वत्सलच्या घरी चिमुकला पाहुणा आला आहे. दोघांनीही काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केली होती.
आई होण्याच्या प्रवासातील सुंदर क्षण इशिताने कॅमेऱ्यात कैद केले होते. तिने गरोदरपणात बरेच मॅटर्निटी शूटही केले होते. अभिनेत्रीचा बेबी शॉवरही चर्चेत होता. बेबी शॉवरचे सर्व विधी बंगाली रितीरिवाजांनी करण्यात आले ज्यासाठी जिथे इशिताची मोठी बहीण तनुश्री दत्ताही पोहोचली. तसेच अभिनेत्री काजोलनेही या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.