मुंबई | 31 जानेवारी 2024 : लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना अनेक गोष्टी घडत असतात. आता तर एका प्रसिद्ध गायकाने चाहत्यांवर माईक फेकून मारला. सध्या गायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गायकाच्या कृत्याची चर्चा रंगत आहे. सध्या ज्या गायकाची चर्चा रंगली आहे, तो गायक दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानी गायक बिलाल सईद आहे. पाकिस्तानी गायक बिलाल याची गाणी भारतात देखील प्रसिद्ध आहे.
चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असणारा बिलाल सईद आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पाकिस्तानशिवाय बॉलीवूड सिनेमांनी आपला आवाज देणारा पाकिस्तानी गायक बिलाल सईदने माईक फेकून चाहत्यांना फटकारले आहे. त्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर बिलाल याने प्रतिक्रिया देखील दिली आहे.
बिलाल सईद याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान पंजाब ग्रुप ऑफ कॉलेज (पीजीसी) यूथ म्यूजिकल फेस्टिवलमध्ये बिलाल याला बोलावण्यात आलं होतं. त्याठिकाणी गायकाने विद्यार्थ्यांसाठी परफॉर्म केलं. या कर्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बिलाल चाहत्यांवर माईक फेकून मारताना दिसत आहे.
But why he did this? #bilalsaeed pic.twitter.com/XcVTdtz3Q6
— Maham (@syedazaidiiii) January 25, 2024
बिलाल गात असताना काही लोकांचं गैरवर्तन लक्षात आल्यानंतर संतापलेल्या बिलाल याने चाहत्यांवर माईक फेकून मारला… गायकाच्या या कृतीनंतर सोशल मीडिया यूजर्स त्याच्यावर खूप टीका करताना दिसत आहेत. यावर गायकाने माफी देखील मागितली आहे..
बिबाल सईद म्हणाला, ‘मंच माझ्यासाठी माझं जग आहे. परफॉर्म करत असताना मी तो क्षण जगत असतो… माझा आजार, तणाव सर्वकाही मी विसरुन जातो. मी जेव्हा चाहत्यांसाठी परफॉर्म करतो, तेव्हा मी सर्वकाही विसरतो. माझ्या आणि माझ्या मंचाच्या सन्मानाच्या आड काणीही आलेलं मला आवडत नाही…
पुढे गायक म्हणाला, ‘मी माझ्या चाहत्यांवर प्रेम करतो आणि कधीकधी ते प्रेम दोन्ही पक्षांसाठी खूप जास्त महागात पडतो. गर्दीत कोणीतरी गैरवर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, पण चुकीची प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ होती! मी फक्त स्टेज सोडायला नको होता. शो चालूच राहिला पाहिजे होता.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सईद याची चर्चा रंगली आहे.