स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करताना विद्या बालनचा तोल गेला अन् ती थेट जमिनीवर बसली; माधुरीने घेतले सांभाळून

| Updated on: Oct 26, 2024 | 1:30 PM

बहूप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया ३' या चित्रपटातील 'आमी जे तोमार' या गाण्यावर लाइव्ह परफॉर्मन्स करत असताना विद्या बालन सोबत एक किस्सा घडला. तिचा पाय साडीत अडून ती थेट जमिनिवर बसली, मात्र या क्षणी तिने दाखवलेल्या तिच्या टॅलेंटमुळे चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.

स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करताना विद्या बालनचा तोल गेला अन् ती थेट जमिनीवर बसली; माधुरीने घेतले सांभाळून
Vidya Balan lost her balance and fell in front of the live audience,
Follow us on

बहूप्रतिक्षित चित्रपट ‘भूल भुलैया ३’ प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. त्याच चित्रपटातील सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे ‘आमी जे तोमार’ या गण्याचे नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यां दोघींनी अप्रतिम नृत्य केल्याचे दिसून आले. या गाण्याच्या रिलीजच्या खास प्रसंगी विद्या बालन व माधुरी दीक्षित यांनी या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मही केलं. मात्र या स्टेजवर गाण्यावर परफॉर्म करण्यात असताना विद्या बालनसोबत एक घटना घडली. तिचा पाय साडीत अडकला आणि ती थेट खाली पडली. मात्र त्यावेळी तिने स्वत:ला सावरत परफॉर्मस् सुरूच ठेवला.

Vidya Balan

या चित्रपटातील बहुचर्चित आणि खूप गाजलेलं गाणं म्हणजे ‘आमी जे तोमार’ हे रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबई येथे या गाण्याच्या नवीन व्हर्जनच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्या बालन व माधुरी दीक्षित यांनी या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मही केलं. माधूरीने गुलाबी रंगाचा लेहंगी परिधान केला होता तर विद्या बालनने मंजुलिकासारखी गोल्डन आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती. दोघीही या आउटफिटमध्ये अगदी सुंदर दिसत होत्या.

साडीत पाय अडकून गेला तोल पण…
माधुरीसोबत परफॉर्म करताना विद्या बालनचा तिच्या साडीत पाय अडकला आणि ती थेट जमिनीवर बसली. मात्र, तिने लगेचच हा क्षण सुंदरपणे हाताळला आणि लेगच डान्स स्टेप करू लागली. तिने इतक्या सुंदरपणे स्वत:वर ताबा मिळवला की प्रेक्षकांना वाटलं ही तिच्या डान्सची एक स्टेप असावी. तिथे उपस्थित लोकांनी सुद्धा विद्याचे मनोबल वाढवले आणि तिला चिअरअप केले. त्यानुळे तिला देखील तो क्षण सांभाळणं सोप गेलं असावं.

Vidya Balan

विद्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विद्याचा हा आत्मविश्वास आणि तिने दाखवलेल्या हुशारीचे कौतुक करत आहे. तसेच विद्याला यावेळी माधुरीनेही तितकीच साथ दिली. विद्याला त्या क्षणी माधुरीनेही आधार देत एक स्टेप केली. तेव्हाही काही क्षण असं वाटलं की या दोघी डान्स स्टेपच करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर माधुरीचेही तितकेच कौतुक होत आहे.

माधुरीसोबत स्क्रीन शेअर करणे सन्मानाची बाब

या परफॉर्मन्सनंतर विद्या बालनने आनंद व्यक्त करत माधुरी दीक्षितबरोबर स्क्रीन शेअर करणे हा तिच्यासाठी खूप सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “एकाच फ्रेममध्ये राहून त्यांच्याबरोबर हँग आउट करणं खूप मोठी गोष्ट आहे. माझी बहिण मला म्हणाली, तुला त्यांच्यासारखं व्हायचं होतं आणि आज तू त्यांच्यासोबत नाचत आहेस, ही खूप मोठी गोष्ट नाही का?”


पुढे ती म्हणाली “होय, ही माझ्यासाठी मोठीच गोष्ट आहे, मी कृतज्ञ आहे. मला खूप मजा आली. आजही बघा, मी पडले पण नंतर त्यांच्या भरोशावर उठून मी पुन्हा परफॉर्म करु लागले” असं म्हणत तिने माधुरीसोबत परफॉर्मन करणे किती भाग्याचे होते याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच यावरून विद्या माधुरीची किती मोठी फॅन आहे हेही दिसून आले.

‘भूल भुलैया 3’ची प्रेक्षकांना आतुरता 

अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘भूल भुलैया’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंत ‘भूल भुलैया’ 2 आला ज्यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसला.तर तब्बूही वेगळ्या भूमिकेत दिसून आली. या दोघांच्याही भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुकच झालं. आता ‘भूल भुलैया 3’ या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे.