अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. शिल्पा – राज संबंधित मुंबई, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या 15 मालमत्तांवर शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. अधिकाऱ्यांनी राज कुंद्रा याची कसून चौकशी देखील केली आहे. रिपोर्टनुसार हे रेड मोबाइल ॲपद्वारे अश्लील व्हिडीओ तयार करणे आणि प्रसारित करणे यावर बंदी घालण्याच्या प्रकरणाशी देखील संबंधित आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी राज कुंद्राला अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी पॉर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे सीज केली आहेत. शिवाय काही बँक खाते देखील सीज केली आहेत. ईडीने काही आरोपींचे देखील बँक खाते सीज केली आहेत. आता या बँक खात्यांमधून पैशांचा व्यवहार होऊ शकत नाही. ईडीच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई, लखनऊ आणि प्रयागराज येथे छापे टाकले.
तपास एजन्सी ईडीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कठकुईयनच्या रोहित चौरसियाला नोटीस बजावून 4 डिसेंबरला मुंबई ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. रोहित चौरसिया याची संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा प्रकरणी सर्च ऑपरेशन पूर्ण झालं आहे. पण तपास अद्याप सुरु आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे राहणारा सॉफ्टवेअर अभियंता असून तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. सविस्तर चौकशी केल्यानंतर त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.
कुशीनगरमधील पडरौना येथील राजपूत कॉलनी आणि कुबेरस्थान येथील काथकुईया येथे दोन संशयितांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. मात्र, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे तपास यंत्रणेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा याला 2021 मध्ये अटक केली होती. त्यानंतर दोन महिन्यानंतर राज याची जामीनावर सुटका झाली. सध्या राज कुंद्रा, अजय भारद्वाजच्या बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित वेगळ्या मनी लाँडरिंगच्या चौकशीच्या भोवऱ्यात आहे. चौकशीसाठी ईडीने शिल्पाचा जुहू येथील बंगला ताब्यात घेतला आहे.
राज कुंद्रा याने पत्नी शिल्पा शेट्टी हिला मालकी हक्क देण्यापूर्वी अवैध पैसे वापरले होते… असा देखील दावा करण्यात येत आहे. शिवाय पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ शूट करण्याचे आरोप देखील राज याच्यावर आहेत. आता राज कुंद्रा केस प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.