मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. रुपरी पडद्यावर अभिनेत्री जेवढी ग्लॅमरस दिसते, रश्मिका खऱ्या आयुष्यात तितकीच मायाळू आणि इतरांचा आदर करणारी व्यक्ती आहे. ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. अभिनय क्षेत्रात यशाच्या उच्च शिखरावर असणारी रश्मिका उच्च शिक्षित आहे. सिनेविश्वातील अनेक अभिनेत्री उच्चशिक्षित आहे. अशा अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या शिक्षणामुळे चर्चेत आली आहे.
रश्मिकाने म्हैसूरच्या इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स अन्ड आर्ट्समध्ये प्री – युनिव्हर्सिटी कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला होता. त्यानंतर अभिनेत्रीने बंगळुरू येथील रमैया कॉलेजमध्ये प्रवेश घेवून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनेत्रीने सायकोलॉजी, इंग्लिश लिटरेचर आणि पत्रकारितेत डिर्गी घेतली आहे. त्यानंतर रश्मिकाने दाक्षिणात्य सिनेविश्वात पदार्पण केलं. आज आभिनेत्री साऊथचं नाही तर, बॉलिवूडची देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने फक्त अभिनयाच यश मिळवलं नसून, ती अभ्यासात देखील हूशार होती. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या शिक्षणाची चर्चा सुरु आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
रश्मिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंंच नाही तर, रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते. पण दोघांनीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला केलं नाही.
रश्मिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली. ‘पुष्पा’ सिनेमात यश मिळवल्यानतंर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘गुडबाय’ सिनेमातून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता आभिनेत्री ‘सीता रामम’ आणि ‘वारिसु’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.