हिना खान ही एकता कपूरच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. एकताच्या दिवाळी पार्टीत हिना निळ्या रंगाच्या लेहेग्यात दिसली होती. यादरम्यान ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
मौनी रॉय अनेक वर्षांपासून एकताच्या दिवाळी पार्टीत सहभागी होत आहे. एकताच्या दिवाळी पार्टीत मौनीने लाईट गुलाबी आणि सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तिच्यावरुन कोणाचीच नजर हटत नव्हती.
क्रिस्टल डिसूझा ग्रे आणि सिल्व्हर कलरच्या चमकदार आउटफिटमध्ये दिसली. क्रिस्टल खूप आकर्षक दिसत होती.या ड्रेस सोबत तिने मोठं झुमके घालणं पसंत केले. स्मोकी आईज सोबत ती खूपच सुंदर दिसत होती.
करिश्मा तन्ना गडद गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसली. करिश्मा बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही आणि आता ती एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत मात्र तिने हजेरी लावली. तिचा सिम्पल लूक सर्वांनाच खूप आवडला.
पार्टीत हरलीन सेठी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिने ग्रे कलरची साडी घातली होती.त्या सोबतच तिने सिम्पल नेकलेस घालून तिच्या लूकमध्ये चारचॉंद लावले.
रिद्धिना पंडित लिंबू रंगाचा लेहेंगा परिधान करून आली होती. त्याच्या हसण्याने नेहमीप्रमाणे सर्वांची मने जिंकली. या लेहेंगासोबत तिने मोठे झुमके घालणे परंत केले.
आशा नेगी ऑफ व्हाइट आउटफिटमध्ये दिसली. आशा सुंदर दिसत होती. तिने या आउटफिट सोबत केस मोकळे सोडले होते. त्याच बरोबर तिने चोकर परिधान केला होता.
पर्ल व्ही पुरी काळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान करताना दिसली. यावेळी पर्ल खूपच सुंदर दिसत होती.त्याच्या कुर्तावरील ब्रुचने सर्वामचेच लक्ष वेधून घेतले.