सापाच्या विषाची तस्करी प्रकरणात अडकलेला एल्विश यादव थेट ‘बिग बॉस 17’च्या मंचावर, सलमान खान याने…

| Updated on: Nov 04, 2023 | 3:51 PM

एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव याच्यावर नुकताच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आलेत. एल्विश यादव याच्या विरोधात थेट गुन्हा देखील नोंद करण्यात आलाय. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

सापाच्या विषाची तस्करी प्रकरणात अडकलेला एल्विश यादव थेट बिग बॉस 17च्या मंचावर, सलमान खान याने...
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. नुकताच बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारमध्ये एल्विश यादव हा पोहचला. एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. थेट एल्विश यादव याच्या रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाची नशा केली जाते, असा आरोप आहे. इतकेच नाही तर थेट विदेशातून या पार्टीसाठी मुलींना देखील मागवण्यात आल्याची धक्कादायक माहिती ही पुढे आली.

एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडलेला असतानाच तो थेट बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारमध्ये पोहचला. एल्विश यादव याला पाहून लोक हैराण झाले. यावेळी बोलताना सलमान खान याच्यासमोर मोठा खुलासा करताना देखील एल्विश यादव हा दिसला. एल्विश यादव सलमान खान याला म्हणाला की, मी बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झालो तेंव्हापासून मला सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतोय.

इतकेच नाही तर सतत माझ्याविरोधात सोशल मीडियावर बोलले जाते. यासर्व गोष्टींना कंटाळून मी थेट बिग बाॅस ओटीटी 2 ची ट्रॉफी घेऊन जाण्यास देखील सांगितले. कारण माझ्याबद्दलचे हे नकारात्मक विचार बिग बाॅस जिंकल्यापासूनच सुरू झाले. यावर सलमान खान याने एल्विश यादव याला मोठा सल्ला दिला.

एकीकडे एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आणि दुसरीकडे तो थेट बिग बॉस 17 च्या मंचावर सलमान खान याच्यासोबत दिसतो. मात्र, या एपिसोडचे शूटिंग अगोदरच करण्यात आल्याचा खुलासा हा नुकताच करण्यात आलाय. एल्विश यादव याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. तीन राज्यांमध्ये त्याला शोधले जात आहे.

एल्विश यादव याच्या इतर सहकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, एल्विश यादव हा अजूनही पोलिसांना मिळाला नाहीये. एल्विश यादव हा विदेशात पळून गेल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे व्हिडीओ शेअर करत एल्विश यादव याने स्पष्ट केले की, तो पोलिसांना सहकार्य करत आहे. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.