मुंबई | 5 मार्च 2024 : अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री मौनी रॉय लवकरच ‘शोटाईम’ मध्ये दिसणार आहेत. ‘शोटाईम’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांना पुन्हा इमरान याचा ‘सिरियल किसर’ अवतार पाहायला मिळणार आहे. अभिनेत्याच्या ‘सिरियल किसर’ अवतारची एक झलक समोर आली आहे. सीरिजमध्ये मौनी रॉय हिला अभिनेता किस करताना दिसत आहे. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मी आणि मौनी रॉय यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे.
‘शोटाईम’ सीरिजया ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. सीरिज बॉलिवूडच्या काळ्या रहस्यांवर आधारलेली आहे. पडद्या मागे काय होत असते… यांसारख्या अनेक गोष्टी ‘शोटाईम’ सीरीजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.
Emraan Hashmi is back with the kiss 😍❤️🔥 #Showtime streaming this friday, 8th march only on Disney+ Hotstar 🎬@emraanhashmi #EmraanHashmi #RajeevKhandelwal #ShriyaSaran #MouniRoy #MahimaMakwana #Dharmatic #KaranJohar #MihirDesai #SonyMusicIndia #bollywood pic.twitter.com/X59fGDhOVA
— Emraan (@page_emraan) March 4, 2024
सीरिजमध्ये मौनी रॉय आणि इमरान यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे. सीरिजमध्ये मौनी हिने यास्मीन अली ही भूमिका साकारली आहे. चाहते देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सीरिजमध्ये इमरान, मौनी यांच्यासोबत अभिनेत्री महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन, विशाल वशिष्ठ, नीरज माधव, विजय राज आणि नसीरुद्दीन शाह देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सीरिज कधी प्रदर्शित होणार याच प्रतीक्षेत चाहते आहेत.
‘शोटाईम’ वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सीरिज 8 मार्च 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. चाहते देखील आता सीरिजच्या प्रतीक्षेत आहेत.
सांगायचं झालं तर, इमरान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होता. त्यानंतर इमरान अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ मध्ये देखील दिसला होता. आता अभिनेता ‘शोटाईम’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजमध्ये मौनी मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.