मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा तूफान चर्चेत आहे. सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटात इमरान हाश्मी हा धमाका करताना दिसला. या चित्रपटात इमरान हाश्मी हा विलनच्या भूमिकेत दिसला. मात्र, प्रेक्षकांनी त्यांचा भूमिकेला प्रेम दिले. आता नुकताच इमरान हाश्मी याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. इमरान हाश्मी याने शाहरुख खान याच्या पार्टी संदर्भात मोठे भाष्य केले. नुकताच शाहरुख खान याच्या बर्थडेनिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. शाहरुख खान याच्या या पार्टीला बाॅलिवूडचे अनेक कलाकार हे पोहचले होते. या पार्टीत धमाका करण्यात आला.
विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या पार्टीमध्ये थेट इमरान हाश्मी हा देखील पोहचला. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी हा शाहरुख खान याच्या पार्टीबद्दल बोलताना दिसला. इमरान हाश्मी म्हणाला की, मी शाहरुख खान याच्या बर्थडे पार्टीमध्ये बारा वाजेपर्यंतच उपस्थित होतो. त्याचे कारणही तितकेच मोठे आहे. मला फार पार्टी वगैरे आवडत नाहीत.
मी दारू देखील कधीच पित नाही. दुसरे म्हणजे मी सकाळी लवकर उठतो, यामुळेच मी बाराला पार्टीबाहेर पडलो. या मुलाखतीच्या माध्यमातून इमरान हाश्मी याने स्पष्ट केले की, तो कधीच दारू पित नाही आणि यामुळेच तो शक्यतो पार्टीला जाण्याचे टाळतो. इमरान हाश्मी पुढे म्हणाला की, मी शक्यतो चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगलाही जाणे टाळतो.
कारण तिथे गेल्यावर चित्रपट बघितल्यावर तुम्हाला त्या चित्रपटाचे काैतुक हे करावेच लागते. मुळात म्हणजे जर चित्रपट चांगलाच नसेल तर मला काैतुक करायला अजिबातच जमत नाही किंवा मी ते करूच शकत नाही. यामुळे मी एकतर चित्रपट घरीच बघतो किंवा सरळ मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतो, मात्र स्पेशल स्क्रीनिंगला जात नाही.
सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. टायगर 3 चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. टायगर 3 चित्रपटाने धमाका केला. टायगर 3 चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कतरिना कैफ ही बिग बाॅस 17 मध्ये पोहचली. यावेळी सलमान खान याच्यासोबत खास डान्स करताना कतरिना कैफ ही दिसली होती. याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले.