Casting Couch | ‘मला त्यांचा हेतू माहिती होता म्हणून रुममध्ये…’, अभिनेत्रीने 2 वेळा केलाय वाईट प्रसंगांचा सामना

| Updated on: Sep 29, 2023 | 12:52 PM

Casting Couch | अनेक अभिनेत्रींनी केलाय कास्टिंग काऊट सारख्या भयानक प्रसंगाचा सामना... 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला दोन वेळा दिग्दर्शकांनी स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, अखेर..., अभिनेत्रीने सांगितलेला अनुभव थक्क करणारा, जाणून तुम्हीही म्हणाल...

Casting Couch | मला त्यांचा हेतू माहिती होता म्हणून रुममध्ये..., अभिनेत्रीने 2 वेळा केलाय वाईट प्रसंगांचा सामना
Follow us on

मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच (Casting Couch). पूर्वी अभिनेत्री त्याच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगाचा खुलासा करत नव्हते. पण आता अभिनेत्री पुढे येतात आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगत असतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना केला. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते यांच्या ऑफरला नकार देत सिनेमात काम करणं टाळलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहेत, तिने दोन वेळा कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. तिने निर्माते, दिग्दर्शकांकडून आलेल्या ऑफरचं सडेतोड उत्तर दिलं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान निर्मात्याने अभिनेत्रीपुढे ‘कॉम्प्रोमाइज’ करण्याची ऑफर ठेवली होती. सध्या अभिनेत्रीने सांगितलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमाचं शुटिंग पूर्ण होणार होतं. तेव्हा निर्मात्याच्या ऑफरसाठी मी नकार दिल्यानंतर त्याने मला सिनेमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला… त्यानंतर अनेक निर्मात्यांनी मला सिनेमे देण्यास नकार दिला. तू आमच्यासाठी काही करशील तर तुला सिनेमात संधी देवू.. असं मला म्हणू लागले…’

पुढे दुसऱ्या घटनेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी दोन वेळा कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. मला तेव्हा त्यांच्या हेतूबद्दल कळलं होतं. तरी देखील मी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी रुममध्ये एकटी राहायची नाही. मी माझ्या मेकअप आर्टिस्टसोबत झोपायची.’ कास्टिंग काऊचवर संताप व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ‘निर्माते स्टारकिड्ससोबत कास्टिंग काऊचचा विचार करत नाही. त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत नाही..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

ईशा गुप्ता हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘आश्रम’ सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘आश्रम’ सीरिजचे तिन्ही सिझनला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. ज्यामुळे ईशा प्रसिद्धी झोतात आली.

ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.