बॉलिवूडमध्ये अनेकांच्या अफेअरच्या चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आहेत. अनेकांचं अफेअर मोडलं सुद्धा पण तरी देखील त्यांच्या जोडीची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये असते. बॉलिवूडचा स्टार अभिनेत्री सनी देओल याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियापासून लांब राहणारा सनी देओल अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत आला होता. आता त्यांचं लग्न झालं असले तरी तो त्याचं पहिलं प्रेम विसरु शकलेला नाही असंच दिसत. कारण अभिनेता अजूनही लपून छपून एका अभिनेत्रीला भेटत असतो. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये सनी देओल गुपचूप कोणालातरी भेटायला आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून बी-टाऊनची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया आहे.
नुकतेच दोघेही मुंबईत स्पॉट झाले होते. दोघेही एकाच इमारतीतून बाहेर पडताना दिसले. दोघांच्या गुप्त भेटीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. दोघांमध्ये काय चालले आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले की, ‘दोघांचे अफेअर आहे’, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, ‘त्यांनी पुन्हा गुपचूप भेटायला सुरुवात केली आहे.’
‘गदर 2’ रिलीज झाल्यानंतरही डिंपल कपाडिया चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी सनी देओलची ब्लॅक कॅप घातली होती, जी त्याने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान परिधान केली होती.
तुम्हाला आठवण असेल की, एके काळी जेव्हा सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत होत्या. नंतर राजेश खन्ना सोबत डिंपल कपाडिया यांनी विवाह केला. पण आता त्यांच्या निधनानंतर डिंपल कपाडिया पुन्हा सनी देओल यांच्या जवळ आल्या आहेत. दोघांची मैत्री इतकी वाढली होती की, सनी देओलही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसत होता. पडद्यावर ही जोडी खूप गाजली होती. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी दोघेही लंडनमध्ये एकत्र व्हेकेशन साजरे करताना दिसले, जिथे दोघे हात हातात धरून बसले होते. तो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, दोघांनीही आजपर्यंत त्यांच्या नात्यावर मौन बाळगले होते. आहे.