Sara Ali Khan | सारा अली खान हिने चक्क बांद्राच्या रस्त्यावर केले ‘हे’ काम, लोक थेट म्हणाले, कोण म्हणेल ही…

| Updated on: Jul 14, 2023 | 6:31 PM

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट हिट ठरला. प्रेक्षकांनी यांच्या जोडीला प्रेम दिले.

Sara Ali Khan | सारा अली खान हिने चक्क बांद्राच्या रस्त्यावर केले हे काम, लोक थेट म्हणाले, कोण म्हणेल ही...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत असलेली अभित्रेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि विकी काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaushal) यांचा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसले होते. सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रेम दिले. जयपुरमध्ये सारा अली खान आणि विकी काैशल हे शाॅपिंग करताना देखील दिसले होते. सारा अली खान ही नेहमीच सोशल मीडियावर (Social media) देखील सक्रिय असते.

विशेष म्हणजे सारा अली खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सारा अली खान ही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. जरा हटके जरा बचके या चित्रपटाने धमाक केल्यानंतर सारा अली खान ही मित्रांसोबत टाईम घालवताना दिसत आहे.

नुकताच सारा अली खान हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सारा अली खान हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. कारण या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही चक्क रस्त्यावरील दुकानांमध्ये खरेदी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती तिच्या मैत्रिणींसोबत फिरत आहे.

मुंबईतील बांद्रा परिसरात रस्त्यावरील दुकानातून खरेदी करताना सारा अली खान ही दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी सारा अली खान हिच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक वगैरे अजिबातच दिसत नाहीये. सारा अली खान हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आणि लोक तिचे काैतुक करताना देखील दिसत आहेत.

सारा अली खान हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, खरोखरच या सारा अली खान हिला मानले पाहिजे. फक्त स्टार किड्स नसून ही कोणत्या खानदानातून येते तरीही इतकी चांगली कशी? दुसऱ्याने लिहिले की, बाॅलिवूडच्या सर्वच स्टार किड्सने सारा अली खान हिच्याकडून नक्कीच काही गोष्टी या शिकाला हव्यात. आता साराचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.