मुंबई : ऋतिक रोशन याची एक्स पत्नी सुजैन खान (Sussanne Khan) ही नेहमीच चर्चेत असते. सुजैन खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सुजैन खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांनी तब्बल लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वांना मोठा धक्का दिला. ऋतिक रोशन याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून सतत सुजैन खान ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुजैन खान यांना दोन मुले आहेत. ऋतिक रोशन याच्याकडे हे दोन्ही मुले राहतात.
ऋतिक रोशन याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सुजैन खान ही अर्सलान गोनी याचा डेट करत आहे. टीव्ही अभिनेता अली गोनी याचा भाऊ अर्सलान गोनी हा असून सुजैन खान त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा सुजैन खान ही अर्सलान गोनी याच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
अर्सलान गोनी आणि सुजैन यांच्या यांच्या रिलेशनवर अनेकजण टीका करताना देखील दिसतात. सध्या सुजैन खान ही अर्सलान गोनी याच्यासोबत सुट्टया घालवण्यासाठी विदेशात गेलीये. यावेळी तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुजैन खान हिने शेअर केलेले हे फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.
अर्सलान गोनी याच्यासोबत सुजैन खान हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. इतके नाही तर सुजैन अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत असून रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे. सुजैन खान हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने म्हटले की, यांना लाजच नाहीये. दुसऱ्याने लिहिले की, हे फोटो पाहून यांच्या मुलांना काय वाटत असेल यार?
तिसऱ्याने लिहिले की, या सुजैन खान हिने लाज सोडलीये. अजून एकाने लिहिले की, 400 कोटी ही फक्त अशा गोष्टींसाठी उधळत आहे. आता सुजैन खान हिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सुजैन खान हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करत आहे. सबा आणि ऋतिक रोशन लवकरच लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.