मुंबई: गायिका फाल्गुनी पाठकचा (Falguni Pathak) एक वेगळाच मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या गाण्यांशी प्रत्येकाच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. 90 दशकातील श्रोत्यांच्या आयुष्यात फाल्गुनीच्या गाण्यांची एक वेगळीच जागा आहे. अशातच जर तिच्या गाण्याचा रिमेक बनवला गेला आणि तो रिमेक फसला तर चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणं साहजिकच आहे. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करसोबत (Neha Kakkar) सध्या असंच काहीसं घडलंय. 90 च्या दशकातील ‘मैने पायल है छनकाई’ या फाल्गुनीच्या सुपरहिट गाण्याचा तिने नुकताच रिमेक बनवला आहे. ‘ओ सजना’ असं या रिमेकचं नाव आहे.
नेहाने गायलेल्या या रिमेकवर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता तर फाल्गुनीनेही नेहाला आरसा दाखवला आहे. नेहाने 19 सप्टेंबर रोजी ‘ओ सजना’ हा तिचा नवीन अल्बम प्रदर्शित केला.
क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि टीव्ही अभिनेत्री प्रियांक शर्मा यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. रिमेकचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तनिष्क बागचीने हे गाणं संगीतबद्ध केलंय.
नेहा कक्करचं हे गाणं प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला. ‘फाल्गुनी पाठकची जागा कोणीच घेऊ शकत नाही’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘जुन्या गाण्याची मजाच घालवली’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आमच्या बालपणीच्या आठवणींना उद्ध्वस्त करू नकोस’, अशीही विनंती युजर्सनी केली.
@TSeries वालों दिमाग़ खराब हो गया है क्या? ओ सजना का रीमेक बना दिया. और गवाया किससे? नेहा कक्कड़ से? काहे ऐसे करते हो यार? बख़्श दो भाई लोग. #osajna
— Akash Kumar (@Akashword) September 22, 2022
Watch original song here make 1B view #nostalgic#nostalgiahttps://t.co/4dvhJCByQt
Stop RUINING original songs ?
Retweet for #falgunipathak
Love for #NehaKakkar (if you love her remix song O sajna) #osajna #maenepayalhchhankai pic.twitter.com/2JLLGhGdbH
— Fandom (@Stars_ki_Duniya) September 23, 2022
नेटकऱ्यांच्या अशा नकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच फाल्गुनीनेही एक स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. एका नेटकऱ्याने नेहाच्या गाण्यावर टीका केल्याची ही पोस्ट आहे. हीच पोस्ट फाल्गुनीने शेअर केली आहे. त्यामुळे नेहाचा उल्लेख न करता फाल्गुनीने तिला आरसा दाखवला आहे.
नेहाचं गाणं आपल्यालाही आवडलं नाही, हे फाल्गुनीने अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं. 1999 मध्ये फाल्गुनीचा ‘मैने पायल है छनकाई’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हे गाणं तुफान गाजलं. इतकंच नव्हे तर इतक्या वर्षांनंतर आजही हे गाणं लोकप्रिय आहे.