अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी संपवलं संपूर्ण कुटुंब, त्यानंतर स्वतःनेही घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Nov 13, 2023 | 9:46 AM

फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं? अभिनेत्याच्या आयुष्यात आलेला 'तो' प्रसंग अत्यंत भयानक; वडिलांनी आधी अभिनेत्याच्या आईला संपवलं, त्यानंतर बहिणीला.. कसा बचावला 'हा' अभिनेता? आजही 'त्या' घटनेची कायम रंगते चर्चा... घडलेला प्रसंग अत्यंत हृदयद्रावक.

अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी संपवलं संपूर्ण कुटुंब, त्यानंतर स्वतःनेही घेतला अखेरचा श्वास
Follow us on

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातील अनेक अशा घटना आहेत, ज्या चाहत्यांना माहिती नसतात आणि समोर आल्यानंतर मोठा धक्का बसतो. झगमगत्या विश्वातील अशा असंख्य घटना आहेत, ज्यांना अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील त्यांची चर्चा कायम रंगत असते. आता देखील अशाच एका घटनेची चर्चा तुफान रंगत आहे. या धक्कादायक घटनेत अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला गमावलं…. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, त्याने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते कमल सदाना (Kamal Sadanah) आहे…

फोटोमध्ये दिसणारे कमल सदाना यांना ओळखणं कठीण आहे. पण त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्याचं यश पाहण्यासाठी त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत नव्हतं. जवळपास 21 वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.

रिपोर्टनुसार, कमल सदामा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला. कमल सदाना यांच्या आईचं नाव सईदा खान होतं. सईदा खान यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. यशाच्या शिखरावर चढत असताना सईदा खान यांनी प्रेमविवाह केला आणि पतीने त्यांची हत्या केली..

सईदा खान यांनी 1971 मध्ये सिनेमा निर्माते बृज मोहन यांच्यासोबत लग्न झालं. लग्नानंतर सईदा आणि बृज यांनी मुलगा कमल सदाना आणि मुलगी नम्रता सदाना यांना जन्म दिला. पण मुलांच्या जन्मानंतर सईदा आणि बृज यांच्यामध्ये वाद होऊ लागले. 1990 मध्ये कमल सदाना याच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती.

वाढदिवसाची पार्टी सुरु असताना बृज नशेत आले आणि अभिनेत्याच्या आईसोबत भांडू लागले. वाद इतका टोकाला पोहोचला की, बृज यांनी पत्नी सईदा यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर आईला वाचवण्यासाठी आलेल्या नम्रता हिच्यादेखील वडिलांनी गोळी झाडली. गोळ्यांचा आवाज ऐकून कमल बाहेर आले, त्यांवर देखील वडिलांनी गोळी झाडली. पण ते बचावले.

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला संपवल्या नंतर बृज यांनी स्वतःला देखील गोळी झाडली आणि अखेरचा श्वास घेतला.. अशा प्रकाने कमल मदाना यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला. या धक्कादायक घटनेमुळे झगमगत्या विश्वात खळबळ उडाली होती.