प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

| Updated on: Aug 03, 2024 | 8:58 PM

भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. दिल्ली येथील रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून यामिनी कृष्णमूर्ती यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज यामिनी कृष्णमूर्ती यांची प्राणज्योत मावळली आहे.

प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
Yamini Krishnamurthy
Follow us on

नुकताच एक दु:खद बातमी येताना दिसत आहे. प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांनी जगाचा निरोप घेतलाय. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शनिवारी 3 ऑगस्ट रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दिल्लीच्या अपोलो रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अपोलो रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. सुनील मोदी यांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटी आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामिनी कृष्णमूर्ती यांच्या निधनाची बातमी त्यांच्या सचिवने दिली आहे. 

यामिनी कृष्णमूर्ती यांच्यावर गेल्या सात महिन्यांपासून ICU मध्ये उपचार सुरू होते. यामिनी कृष्णमूर्ती यांना नृत्य क्षेत्रातील योगदानामुळे देशातील तीन सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. 1968 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण असे पुरस्कार देण्यात आले. 

यामिनी कृष्णमूर्ती यांचे पार्थिव त्यांच्या यामिनी स्कूल ऑफ डांन्स संस्थेत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता संस्थेत त्यांचे पार्थिव आणले जाईल. मात्र, यामिनी कृष्णमूर्ती यांच्या अंतिम संस्कारबद्दल काहीही माहिती अजून मिळू शकली नाहीये. 

यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले येथे झाला. मात्र, यामिनी कृष्णमूर्ती यांचे बालपण हे तामिळनाडूमध्ये गेले. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यममध्ये पदार्पण केले. भरतनाट्यम क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान नक्कीच राहिले आहे.