वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न, ‘लव्हस्टोरी’ हवी तर ‘या’ दोघांसारखी

| Updated on: Jan 05, 2024 | 2:10 PM

Love Life : बॉलिवूडमध्ये काही असे कपल आहेत, जे फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत... वयाच्या 22 व्या वर्षी ज्या अभिनेत्यावर प्रेम केलं, त्याच 44 वर्षीय अभिनेत्यासोबत थाटला संसार..., दोघांची 'लव्हस्टोरी' आहे प्रचंड खास

वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न, लव्हस्टोरी हवी तर या दोघांसारखी
Follow us on

मुंबई | 5 जानेवारी 2024 : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री, अभिनेते यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा तुफान रंगलेली असते. सेलिब्रिटी कपल कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. बॉलिवूडमध्ये घटस्फोट आता अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांचा प्रेम निभावण्यासाठी अनेक प्रयत्न करायचे. आजच्या काळात असे कपल फार कमी आहेत. बॉलिवूडमध्ये असं एक कपल आहे, ज्यांच्या ‘लव्हस्टोरी’ची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्री 44 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न केलं आणि संसार थाटला… सध्या ज्या कपलची चर्चा रंगत आहे, ते कपल दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेत्री सायरा बानो आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आहे. दिलीप कुमार आज जगात नाहीत, पण त्यांच्या असंख्य आठवणी सायरा बानो आणि चाहत्यांच्या मनात कायम आहेत..

एक काळ असा होता जेव्हा सायरा बानो यांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सायरा बानो यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. पण सायरा बानो फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या. आज देखील सायरा बानो कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

अनेक सिनेमांमुळे सायरा बानो प्रसिद्धी झोतात आल्या. अभिनेते दिलीप कुमार यांच्या सोबत असलेल्याल नात्यामुळे देखील सर्वत्र सायरा बानो यांची चर्चा रंगली होती. सायरा बानो यांच्यासाठी प्रेमाची खरी व्याख्या म्हणजे फक्त आणि फक्त दिलीप कुमारच होते. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर सायरा बानो यांनी अशी एक अट ठेवली ज्यामुळे दिलीप कुमार यांनी देखील गुडघे टेकले.

हे सुद्धा वाचा

‘पडोसन’ सिनेमासाठी दिग्दर्शक महमूद यांनी सायरा बानो यांची निवड केली. पण सायरा बानो यांनी सिनेमासाठी महमूद यांना  नकार दिला. कारण सायरा बानो यांना लग्नानंतर पती दिलीप कुमार यांच्यापासून वेगळं व्हायचं नव्हतं. तेव्हा सिनेमासाठी सायरा बानो यांना तयार करणं फार कठीण होतं. अखेर महमूद यांनी दिलीप कुमार यांनी सांगितलं…

सायरा बानो पती दिलीप कुमार यांचं देखील ऐकण्यासाठी तयार नव्हत्या आणि ‘पडोसन’ सिनेमासाठी महमूद यांना मुख्य अभिनेत्री म्हणून सायरा बानो यांची जागा दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्रीला द्यायची नव्हती. अखेर महमूद यांनी ज्या शहरात दिलीप कुमार यांच्या सिनेमाची शुटिंग सुरु आहे, त्याच शहरात ‘पडोसन’ सिनेमाच्या शुटिंगसाठी सेट तयार केला. तेव्हा सायरा बानो यांनी ‘पडोसन’ सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला. ज्यामुळे सायरा बानो यांना पती दिलीप कुमार यांच्यासोबत वेळ व्यतीत करता येईल…

अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांनी 7 जुलै 2021 मध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी दिलीप कुमार यांचं निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पत्नी सायरा बानो आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.