‘एक दुजे के लिए’, ‘कुली’, ‘तवायफ’ यांसारख्या हीट अनेक सिनेमांममध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. भारतीय सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत रती यांचं नाव अव्वल स्थानी होतं. रती यांनी प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवलं पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये करियर यशाच्या शिखरावर असताना रती यांनी प्रसिद्ध व्यक्ती आणि उद्योजक अनिल विरवानी यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांना वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही.
रती अग्निहोत्री यांचा वरळी येथील पेंटहाऊसच्या खोलीतून आजही अभिनेत्रीच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येतो. जेथे रती यांच्यावर अत्याचार झाले. लग्नानंतर रती घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्या. रती यांचे पती कायम रागात अभिनेत्रीला मारहाण करायचे. लग्नाच्या काही दिवसांनंतर पतीकडून रती यांच्यावर अत्याचार सुरु झाले आणि पुढे 30 वर्ष परिस्थितीमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत.
एका मुलाखतीत खुद्द रती यांनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांवर मौन सोडलं. जेव्हा रती यांच्यावर पतीकडून अत्याचार व्हायचे तेव्हा रती पेंटाहाऊसमध्ये चारही बाजून पळत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करायच्या. मारहाण अशी असायची ज्याच्या जखमा शरीरावर कुठेच नाही दिसायच्या. पण स्मार्टफोन आल्यानंतर रती यांनी शरीरावर असलेल्या जखमांचे फोटो काढण्यास सुरुवात केली.
7 मार्च 2015 मध्ये रती यांचा मुलगा तनुज सिनेमाच्या शुटिंगसाठी पुणे येथे गेला होता. तेव्हा रती स्वतःचा बचाव करत दरवाजाच्या मागे लपल्या होत्या. रती म्हणाल्या, ‘मी विचार केला मी 54 वर्षांची महिला आहे. हळू-हळू वृद्ध होत आहे. एक दिवस मार अत्याचार सहन करून मरुन जाईल…’
अखेर रती यांनी पती विरोधात तक्रार दाखल केली. जेथे रती यांनी चाकू झालेल्या हल्ल्याची देखील कबुली दिली. पण काही तडजोड झाल्यानंतर आज रती कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. रती मुलासोबत कायम फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असतात. सध्या सर्वत्र रती अग्निहोत्री यांची चर्चा रंगली आहे.
रती अग्निहोत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.