निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला…, ऐकताच ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Mar 19, 2025 | 9:54 AM

निर्मात्यासोबत प्रेमसंबंध अभिनेत्रीला पडले महागात, त्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला..., घटनेचं ऐश्वर्या राय हिच्यासोबत कनेक्शन, अखेर ऐश्वर्याने घेतला मोठा निर्णय

निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला..., ऐकताच ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय
फाईल फोटो
Follow us on

एक दिवस त्याने मला प्रचंड मारलं… त्याने माझा जबजा तोडला… तो थांबला नाही… माझ्या प्रायव्हेट पार्टला त्याने मारलं आणि माझ्याकडून फोन देखील काढून घेतला… बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा निर्णय घेतला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, तिने एका निर्मात्याला डेट केलं, ज्याने अभिनेत्रीचा छळ केला. जेव्हा ऐश्वर्या राय हिला निर्मात्याच्या कृत्याबद्दल कळलं तेव्हा निर्मात्यासोबत काम करण्यास ऐश्वर्याने नकार दिला.

सांगायचं झालं तर, ज्या अभिनेत्रीवर अत्याचार झाले ती दुसरी तिसरी कोणी नसून फ्लॉरा सॅनी आहे. 2018 मध्ये फ्लॉरा हिने मीटू मोहिमेअंतर्गत निर्माता बॉयफ्रेंडवर अनेक गंभीर आरोप केले. निर्माता कायम फ्लॉरावर अत्याचार करायचा. कधी तिला काम सोडायला लावायचा… तर कधी तिचा फोन खेचून घ्यायचा.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री म्हणाली, एकदा त्याने मला इतकं मारलं की माझआ जबडाही तुटला. माझ्या प्रायव्हेट पार्टवरही ठोसे मारण्यात आले ज्यामुळे मी बेशुद्ध झाली. शुद्धीवर येताच मी त्याच्या घरातून पळ काढला आणि त्यानंतर पुन्हा कधी त्या निर्मात्याचा चेहराच पाहिला नाही.

 

 

फ्लॉराच्या कठीण काळात ऐश्वर्या राय हिने तिची साथ दिली. एवढंच नाही तर, ऐश्वर्याने त्या निर्मात्यासोबत काम करण्यास देखील नकार दिला. निर्मात्यावर गंभीर आरोप केल्यानंतर फ्लॉरा हिच्यासोबत कोणीच काम करण्यात तयार नव्हतं. एका मुलाखतीत फ्लॉरा हिने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली.

अभिनेत्री फ्लॉरा म्हणाली, ‘मला असं वाटलं की फार मोठी चूक केली आहे. कारण जेव्हा मी निर्मात्याचे सत्य सर्वांसमोर उघड केलं तेव्हा कोणीही माझ्यासोबत काम करायला तयार नव्हते. समस्या अशी होती की मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य आहे आणि तेव्हा मी अनेक संकटांचा सामना केला आहे. तेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हतं. पण ऐश्वर्याने माझी साथ सोडली नाही. त्यामुळे मी कायम ऐश्वर्याची ऋणी राहील…

फ्लॉरा सैनीने असेही सांगितलं की, ऐश्वर्याने त्या प्रसिद्ध निर्मात्यासोबत एक सिनेमाही साइन केला होता. पण जेव्हा तिला या गोष्टी कळाल्या तेव्हा तिने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि कोणत्याही महिलेला अशा प्रकारे त्रास देणाऱ्या पुरुषासोबत काम करू शकत नसल्याचे सांगितले. ज्या निर्मात्यावर फ्लॉराने गंभीर आरोप केले, त्या निर्मात्याचं नाव गौरांग दोषी आहे.