Nepal Plane Crash: नेपाळ याठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. नेपाळमध्ये रविवारी सकाळी एक मोठा विमान अपघात झाला (Pokhra Plane Crash). यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानात 5 भारतीय आणि 4 क्रू सदस्यांसह 68 प्रवासी होते. या अपघातामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्दैवी अपघातानंतर आतापर्यंत ६९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्दैवी अपघातात एका प्रसिद्ध गायिकाचं देखील निधन झालं आहे. ज्यामुळे चाहत्यांना आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
नेपाळ विमान अपघातात निधन झालेल्या गायिकेचं नाव नीरा छन्त्याल असं आहे. ही दुःखद बातमी कळाल्यानंतर नीराच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेपाळ विमान अपघातात मृत पावलेल्यांचा शोध अद्याप सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीरा एका कार्यक्रमासाठी रवाना झाली होती.
पण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच गायितेचं निधन झालं आहे. नीराच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेपाळ येथील गायिका नीरा सोशल मीडियावर सक्रिय होती. जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी गायिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगायची. पण आता तिच्या निधनांमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
नेपाळमध्ये नीराला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. नीराची गाणी सोशल मीडियावर कायम व्हायरल होतल असत. नीराच्या अपघाती निधानामुळे नेपाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या नीराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाने रविवारी सकाळी काठमांडूहून उड्डाण केलं. या अपघातात को-पायलट अंजू खतिवडा आणि एका एअर होस्टेसचाही मृत्यू झाला.
यती एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिषेक कुशवाह, विशाल शर्मा, अनिल कुमार राजभर, सोनू जैस्वाल आणि संजना जैस्वाल अशी विमानात बसलेल्या पाच भारतीयांची नावे आहेत . भारतीय दूतावासानेही 68 प्रवाशांमध्ये पाच भारतीयांचा समावेश असल्याची पुष्टी केली आहे.