प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू, कुटुंबीयांकडून विषप्रयोग झाल्याचा आरोप, 15 दिवसांपूर्वी नक्की झालं तरी काय?

| Updated on: Sep 20, 2024 | 1:44 PM

Famous Singer Death: 15 दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिकेसोबत नक्की झालं तरी काय? गायिकेच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ... कुटुंबीयांकडून विषप्रयोग केल्याचा आरोप..., सिनेविश्वात खळबळ...

प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू, कुटुंबीयांकडून विषप्रयोग झाल्याचा आरोप, 15 दिवसांपूर्वी नक्की झालं तरी काय?
Follow us on

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका प्रसिद्ध गायिकेचं निधन झालं आहे. गायिकेचं निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी तिच्यावर विषप्रयोग झाल्याचे आरोप केले आहे. वयाच्या 27 व्या ज्या गायिकेने स्वतःचे प्राण गमावले आहेत, ती गायिका दुसरी तिसरी कोणी नसून ओडिशा संगीत क्षेत्रातील गायिका रुखसाना बानो आहे. 15 दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान सेटवर ज्यूस पिऊन आजारी पडलेल्या गायिका रुखसाना बानोचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पश्चिम ओडिशातील एका प्रतिस्पर्धी गायकाने रुखसाना हिला विष दिल्याचे आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुखसाना ही ओडिशातील संबलपुरी येथील रहिवासी होती. ती एक प्रसिद्ध गायिका होती. भुवनेश्वरच्या एम्समध्ये उपचारादरम्यान गायिकेचा मृत्यू झाला.

रूखसाना हिच्यावर स्क्रब टायफस (उच्च ताप) आजारावर उपचार सुरू होते. पण बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी घोषित केलं. निधनानंतर कुटुंबिय आरोप करत आहेत. पण निधानाचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही.

गायिकेच्या निधनानंतर रुखसाना हिच्या आई आणि बहिणीने गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम ओडिशातील एका स्पर्धक गायिकाने रुखसाना हिला विष दिल्याचे आरोप करण्यात येत आहेत. गायक कोण आहे याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र रुखसानाला यापूर्वीही धमक्या आल्याचा दावा करण्यात आला आहे.

15 दिवसांपूर्वी ज्यूस प्यायल्यानंतर रुखसानाची प्रकृती खालावली

कुटुंबीयांनी सांगितले की, रुखसाना 15 दिवसांपूर्वी बोलंगीरमध्ये शूटिंगदरम्यान ज्यूस पिऊन आजारी पडली होती. 27 ऑगस्ट रोजी तिला भवानीपटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान, रुखसाना हिचं निधन झालं.

रुखसाना हिची बहीण बानो म्हणाली, ‘प्राथमिक उपचारानंतर रुखसाना हिला बोलंगीर येथील भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. प्रकृती खालावल्यानंतर तिला बारगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली नाही.’