मुंबई : ‘बिग बॉस 16 ‘ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अब्दू रोझिक (Abdu Rozik) याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. एकेकाळी रस्त्यावर गाणं गाणारा अब्दू आज एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ‘बिग बॉस 16 ‘ दरम्यान प्रेक्षकांनी देखील अब्दूला भरभरुन प्रेम दिलं. बिग बॉसमधली अब्दूचा प्रवास संपला असला तरी, त्याला पुन्हा पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता फक्त बिग बॉसमध्ये दिसणाऱ्या अब्दूला चाहत्यांना भेटता येणार आहे. अब्दू मुंबईमध्ये त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अब्दू चाहत्यांना भेटणार आहे. सोशल मीडियावर अब्दूने व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अब्दूने चाहत्यांना कुठे भेटता येणार याची माहिती दिली आहे. सध्या अब्दूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या गाण्याच्या लाँच दरम्यान अब्दू चाहत्यांना भेटणार आहे.
व्हिडीओमध्ये अब्दू म्हणतो, ‘१५ जानेवारी रोजी मुंबईत माझं नवीन गाणं ‘प्यार’ लाँच करत आहे. म्हणून मला भेटण्यासाठी नक्की या…’ या कार्यक्रमात अब्दूने चाहत्यांना निमंत्रण दिलं आहे. कुर्ला येथील ‘फीनिक्स मार्केटसिटी’ मॉलमध्ये अब्दूचं नवं गाणं ‘प्यार’ लाँच होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील अब्दूला भेटू शकता.
सोशल मीडियावर अब्दू कायम सक्रिय असतो. अब्दूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर अब्दूला जवळपास ६.८ मिलियन युजर्स फॉलो करतात. एवढंच नाही, तर अनेक सेलिब्रिटी देखील अब्दूचं कौतुक करतात.
एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा देखील केला. एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. अब्दू एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण ती मुलगी अब्दूला सोडून गेली.