सुपरहीट सिनेमा पाहताना चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ

| Updated on: Sep 30, 2024 | 11:36 AM

सुपरहीट सिनेमा पाहताना चाहत्यांच्या आनंद गगनात, पण चित्रपटगृहात अचनाक झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ, सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चाहत्यांच्या मृत्यूची चर्चा...

सुपरहीट सिनेमा पाहताना चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर येताच खळबळ
Follow us on

आवडत्या सेलिब्रिटीचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहते चित्रपटगृहात गर्दी करतात आणि सिनेमाचा आनंद घेत अभिनेता, अभिनेत्रीवर असलेलं प्रेम व्यक्त करतात. आता देखील एक चाहता सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचला पण घरी परतलाच नाही. सिनेमाचा आनंद लुटत असताना चाहत्यांचं निधन झालं. ज्यामुळे चित्रपटगृहात मोठी खळबळ माजली. अभिनेता ज्यूनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारर ‘देवरा’ सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलेल्या एका चाहत्यांचं अचानक निधन झालं आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. तेव्हा नक्की काय झालं जाणून घेऊ…

संबंधित प्रकरण आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील आहे. ‘देवरा’ सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्यांचं निधन झालं आहे. चाहत्याचं नाव मस्तान असं आहे. सिनेमा पाहत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मस्तान याचं निधन झालं.

 

 

मस्तान याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तो जमीनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. अशात मस्तान याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करताना मस्तान याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि पोलीस दिसत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटलेल्या घटनेनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे.

‘देवरा’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘देवरा’ सिनेमा सध्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी जगभरात 140 कोटी रुपयांची कमाई केली. तर देशात सिनेमाने 82.5 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. दुसऱ्या दिवशी सिनेमाने रात्री 9 वाजेपर्यंत 35.70 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी सिनेमाने 40 कोटी रुपयांची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने आतापर्यंत भारतात 161 कोटी रुपयांची कमाई केली आहे.