मुंबई : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा ही मुंबईतील एका सलून बाहेर स्पाॅट झालीये. यावेळी पापाराझी यांना पाहून धावत जाताना व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही दिसतंय. इतकेच नाही तर तिच्या पायाला मार लागलेला मोठा डाग दिसतोय.
कॅमेऱ्यापासून हा डाग लपवण्याचा प्रयत्न करताना मलायका अरोरा ही दिसतीये. मलायका अरोरा हिच्या पायाला काळा मोठा डाग पडलाय. यावरून हा अंदाजा लावला जात आहे की, मलायका अरोरा हिला ही गंभीर दुखापत पडल्यामुळेच झालीये. आता मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
मलायका अरोरा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केलाय. मलायका अरोरा हिला नेमके काय झाले हेच विचारताना चाहते हे दिसत आहेत. नुकताच आता मलायका अरोरा हिचा 48 वा वाढदिवस अत्यंत खास प्रकारे साजरा करण्यात आला. मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट अर्जुन कपूर याने शेअर केली.
इतकेच नाही तर मलायका अरोरा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे खास डान्स करताना दिसले. मलायका अरोरा हिचा डान्स तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले. यासाठी मलायकाचे काैतुक देखील करण्यात आले.
मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आले. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूर याला डेट करतंय. काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसले. यावेळी काही खास फोटो अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर शेअर केले.