रानी चटर्जी ही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे रानी चटर्जी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. रानी चटर्जी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करते. आता नुकताच रानी चटर्जी हिने शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. रानी चटर्जी हिने मोठा काळ गाजवलाय. रानी चटर्जी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून अत्यंत लग्झरी लाईफ जगते. रानी चटर्जीचा चाहता वर्गही मोठा आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
रानी चटर्जी हिने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये अभिनेत्री चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. हेच नाही तर मागे गावातील घर दिसत आहे. या व्हिडीओनंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. अनेकांना वाटले की, रानी चटर्जी ही आलिशान लाईफ सोडून गावी कायमचे राहण्यासाठी गेली. मात्र, तसे काहीही नाहीये.
रानी चटर्जी हिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या शूटिंगसाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. रानी चटर्जी हिच्या आगामी दीदी नंबर 1 चित्रपटाचे शूटिंग सुरू असून यासाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक बनवत आहे. आता चाहते हे रानी चटर्जी हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
या चित्रपटात रानी चटर्जी ही गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटले की, तुम्ही भोजपुरी क्वीन आहात. दुसऱ्याने लिहिले की, मी तुमच्या अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. तिसऱ्याने लिहिले की, तुमच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्रीच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
रानी चटर्जी ही मोठ्या संपत्तीची मालकीन असून अत्यंत आलिशान असे लाईफ रानी चटर्जी ही जगते. मोठा चाहतावर्ग रानी चटर्जी हिचा आहे. रानी चटर्जी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रानी चटर्जी हिच्या चित्रपटांची चाहते कायमच वाट पाहताना दिसतात. रानी चटर्जी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.