प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. धर्मेंद्र यांचे चित्रपट नेहमीच धमाका करताना दिसतात. विशेष म्हणजे धर्मेंद्र हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतानाही धर्मेंद्र दिसतात. धर्मेंद्र यांचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. धर्मेंद्र यांचे दोन लग्न झाले आहेत. 19 व्या वर्षीच धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. पहिल्या लग्नाच्या 26 वर्षानंतर त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले. एका 27 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीसोबतही धर्मेंद्र यांचे नाव जोडले गेले होते.
नुकताच आता धर्मेंद्र यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये धर्मेंद्र हे अत्यंत दुखी दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी हा फोटो त्यांच्या कोणत्यातरी चित्रपटातील शेअर केलाय. ज्यामध्ये ते त्रस्त आणि उदास दिसत आहेत. हेच नाही तर धर्मेंद्र यांच्या डोळ्यात अश्रू देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन देखील शेअर केले आहे.
धर्मेंद्र म्हणाले की, आंधळा विश्वास आणि गोड वृत्ती काही वेळा मोठी चूक ठरते. आता अभिनेत्याची ही पोस्ट पाहून लोक टेन्शनमध्ये आले आहेत. हेच नाही तर अनेकांनी धर्मेंद्र यांना सर्वकाही ठीक आहे ना? हा प्रश्नच थेट विचारलाय. एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, अशी तुमची पोस्ट पाहून चिंता होते, नेमके काय सुरू आहे?
दुसऱ्याने म्हटले की, सर काय झाले? तुम्ही असे नका करू..तिसऱ्याने विचारले की, काय झाले पाजी? धर्मेंद्र हे ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात शेवटी अभिनय करताना दिसले होते. हेच नाही तर धर्मेंद्र हे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. धर्मेंद्र यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय नक्कीच ठरलीये.
बॉयोपिकमध्ये ईशा देओल हिने सावत्र आईसोबत पहिली मुलाखत कशी होती हे सांगितले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या दोन मुली असून ईशा देओल आणि अहाना त्यांची नावे आहेत. ईशाने थेट म्हटले होते की, मी ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा बघितले. त्यावेळी मी त्यांच्या पाया पडले. विशेष म्हणजे त्यांनीही काहीही विचार न करता मला आर्शिवाद देऊन टाकले.