अभिनेत्री पवित्रा पुनिया हिने अभिनय क्षेत्रामध्ये मोठा काळ गाजवला आहे. बिग बॉसच्या घरात देखील तिने धमाका केला. मुळात म्हणजे पवित्रा पुनिया ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलीये. बिग बॉसच्या घरातच पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही पवित्रा पुनिया आणि एजाज खान हे अनेक वर्ष एकमेकांना डेट करताना दिसले. हेच नाही तर पवित्रा पुनिया आणि एजाज लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
एजाज खान याच्यासोबत ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच पवित्रा पुनिया हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पवित्रा पुनिया हिने शेअर केलेले हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर पवित्रा पुनिया हिने सर्वांच्या गुपचूप लग्न केल्याचेही सांगितले जातंय. हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
पवित्रा पुनियाने इन्स्टाग्रामवर नवविवाहित वधूप्रमाणे कपडे घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने खास मेकअप केला असून तिच्या हातावर आणि पायावर मेंहदी देखील दिसत आहे. यामुळेच पवित्रा पुनिया हिने सर्वांच्या गुपचूप लग्न केल्याची जोरदार चर्चा आहे.
अनेकांनी पवित्रा पुनिया हिने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत थेट म्हटले की, नेमके कोणासोबत लग्न केले? हे फोटो शेअर करत पवित्रा पुनिया हिने खास कॅप्शन दिल्याचे देखील बघायला मिळतंय. पवित्रा पुनिया हिने ‘श्री’ असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये पवित्रा पुनिया ही जबरदस्त अशा लूकमध्ये नक्कीच दिसत आहे.
लग्नाची सतत चर्चा असताना यावर पवित्रा पुनिया हिने काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये. एकाने या फोटोंवर कमेंट करत थेट म्हटले की, सिंदूर? दुसऱ्याने म्हटले की, एजाज खान याच्यासोबत लग्न केले की, दुसऱ्या कोणासोबत. आता पवित्रा पुनिया ही तिच्या लग्नाबद्दल काय खुलासा करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.