देशात कोणत्याच ठिकाणी आज महिला सुरक्षित नाही. ज्या देशात महिलांनी देवीचं स्थान दिलं जात त्याच देशात अनेक ठिकाणी 3 वर्षाच्या मुलींपासून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत अत्याचार होत आहेत. नुकताच कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. तर बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैगिंक अत्याचार केले. घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रसत्यावर उतरले होते. त्यानंतर देखील अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. दरम्यान देशात महिलांच्या सुरक्षेवरून वादग्रस्त वातावरण असताना जनतेने अभिनेता आमिर खान याच्याकडे मोठी मागणी केली आहे.
सांगायचं झालं तर, 2012 मध्ये अभिनेता आमिर खान याने टीव्ही विश्वात पदार्पण करत एका शोची सुरुवात केली होती. त्या शोचं नाव होतं ‘सत्यमेव जयते’. शोचे तीन भाग आले. शोमध्ये आमिर खान याने समाजातील संवेदनशील मुद्द्यांवर बोट ठेवला. स्त्री भ्रूणहत्या, बाल लैंगिक शोषण, बलात्कार, घरगुती हिंसा… यांवर अभिनेत्याने अनेक गोष्टी समाजासमोर आणल्या.
‘सत्यमेय जयते’ शोमुळे समाजात जागृतता निर्माण होण्यास मदत झाली. प्रेक्षकांनी देखील शोला भरभरुन प्रतिसात दिला. शोच्या एका भागामध्ये अभिनेत्याने मुलांना चांगला स्पर्ष आणि वाईट स्पर्ष यांमधील अंदर देखील समजावून सांगितला. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता लहान मुलांना चांगल्या – वाईट गोष्टी सांगताना दिसत आहे.
अभिनेत्याने मुलींना तीन अशा अवयवांबद्दल सांगितलं, जेथे अनोखळ्या व्यक्तीने स्पर्ष केल्यास ओरडायचं आणि सुरक्षित स्थळी पळून जायचं… अभिनेता म्हणाला, ‘तुमचे आई वडील तुम्हाला स्पर्ष करत असतील तर काहीही हरकत नाही. डॉक्टरांनी देखील स्पर्ष केलं तरी काही हरकत नाही. पण डॉक्टर देखील तुमच्या आई-वडिलांसमोर तुम्हाला स्पर्ष करू शकतात…’ असं अभिनेत्याने मुलांना सांगितलं होतं.
अशात समाजात होत असलेल्या वाईट घटना पाहाता ‘सत्यमेव जयते’ शो पुन्हा सुरु करण्याची वेळ आता आली आहे… असं जनतेचं मत आहे. त्यामुळे आमिर खान याने पुन्हा नव्याने ‘सत्यमेव जयते’ शोची सुरुवात करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे. कोलकाता आणि बदलापूर घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.