मुंबई : आलिया भट्ट आणि करीना कपूर (Kareena Kapoor) या दोघीही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच आता आलिया भट्ट हिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार अशी कामगिरी ही नक्कीच केलीये. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह (Ranveer Singh) हा देखील मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट हिट ठरलाय. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे दिसले होते.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला घेऊन करीना कपूर खान हिच्या घरी गेली होती. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. करीना कपूर ही रणबीर कपूर याची चुलत बहीण आहे आणि आता करीना कपूर ही आलियाची ननंद आहे. दोघी अगोदरपासूनच चांगल्या मैत्रिणी देखील आहेत.
आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपट केले आहेत. मात्र, एकदाही एकाच चित्रपटामध्ये काम करताना कधीच आलिया भट्ट आणि करीना कपूर दिसल्या नाहीत. नुकताच आलिया भट्ट हिने एक खास फोटो शेअर केली आहे. या पोस्टसोबतच आलिया भट्ट हिने करीना कपूर हिच्यासोबतचे अत्यंत खास फोटो देखील शेअर केले आहेत.
ही पोस्ट शेअर करताना आलिया भट्ट हिने म्हटले की, कोणी आम्हाला एकसोबत काम देईल का, म्हणजे आम्हाला गप्पा मारता येतील…आता आलिया भट्ट हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. काही मिनिटांमध्ये ही पोस्ट चांगलीच व्हायरल झालीये.
आलिया भट्ट हिने शेअर केलेल्या या पोस्टवर करण जोहर याने देखील कमेंट केलीये. आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी थेट सोशल मीडियावरच पोस्ट शेअर करत चित्रपटांमध्ये काम मागितल्याने अनेकांनी आर्श्चय देखील व्यक्त केले जात आहे. या पोस्टवर कमेंट करत एकाने म्हटले की, आलिया तू करीना कपूर हिच्यासोबत नको काम करू…
दुसऱ्याने लिहिले की, मुळात म्हणजे आलिया भट्ट हिला चित्रपटामध्ये काम मागण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्याची अजिबातच गरज नव्हती. कारण तिने जर करण जोहरला एक फोन केला असता तर करणने दहा चित्रपटांमध्ये दोघींना एकसोबत घेतले आहे. करण जोहर हा आलिया हिचा चमचाच आहे. ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे.