Video | उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोकांनी लावला डोक्याला हात, यावेळी चक्क खिळ्याने अभिनेत्रीने…

| Updated on: Aug 07, 2023 | 4:30 PM

उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही निर्माण केलीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते.

Video | उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोकांनी लावला डोक्याला हात, यावेळी चक्क खिळ्याने अभिनेत्रीने...
Follow us on

मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. मुळात म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नसतो. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. इतकेच नाही तर थेट उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे देखील जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम (Result) हा होत नाही. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या कपडयांच्या विरोधात थेट पोलिसांमध्ये धाव घेतली होती. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही उर्फी जावेद विरूध्द चित्रा वाघ असा सामना बघायला मिळाला. चित्रा वाघ यांच्या टिकेला उत्तर देताना उर्फी जावेद ही दिसली.

काही दिवसांपूर्वीच चक्क पापाराझी यांना पाहून चेहरा लपवताना उर्फी जावेद ही दिसली होती. पापाराझी यांना पाहून उर्फी जावेद म्हणाली की, माझे फोटो घेऊ नका. मला माहिती नव्हते की, तुम्ही इथे येणार आहात, मी अजिबात मेकअप केला नाही. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला होता.

नुकताच आता उर्फी जावेद ही तिच्या नव्या आणि अतरंगी लूकमध्ये दिसली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना धक्का बसला आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांनी कमेंट करत म्हटले की, ही उर्फी जावेद काय घालेल याचा अंदाजा बांधणे खरोखरच खूप जास्त अवघड आहे. आता उर्फी जावेद हिच्या नव्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेद ही काळ्या रंगाच्या बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. मात्र, या बिकिनीला चक्क खिळे (स्क्रू) लावले आहेत. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. बिकिनीसोबतच उर्फी जावेद हिने स्कर्ट घालता आहे. या लूकसोबतच उर्फी जावेद हिने वेणी घातल्याचे दिसत आहे. आता याचे फोटो व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद हिच्या या फोटो आणि व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, हे आता काय केले या उर्फी जावेदने. दुसऱ्याने लिहिले की, कोणीही आज हिची गळाभेट चुकूनही घेऊ नका. तिसऱ्याने लिहिले की, आज काय केले या उर्फी जावेद हिने हे अतरंगी….