मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्याचा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्या खास मैत्रिणीने पोस्ट केला आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आहे. राजकुमार राव याचा पत्नी पत्रलेखा हिच्यासोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. चहात्यांना देखील दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे. शुक्रवारी हे कपल त्यांचे खाजगी क्षण एन्जॉय करताना दिसलं होतं, तेव्हा हुमा कुरेशी आणि साकिब सलीम यांनी दोघांना टोकलं.
एवढंच नाही तर बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फरहा खान हिने पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचे खाजगी क्षण कॅमेरात कैद केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त पत्रलेखा आणि राजकुमार यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे राजकुमार राव आणि पत्रलेखन एका ठिकाणी उभे आहेत. तेव्हाच साकिब आणि हुमा कुरेशी त्या ठिकाणी येतात दोघांना पाहिल्यानंतर अभिनेता आणि पत्नी हैराण झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ फरहा खान हिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे.
सांगायचं झालं तर राजकुमार राव, पत्रलेखा, साकेत सलीम, हुमा कुरेशी आणि फराह खान एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट देखील केलं जाते. फराह खान हिने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘Mad night out with Mad friends’ असं लिहिलं आहे.
पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान वायरल होत आहे. चहाते देखील दोघांच्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट चा वर्षाव करत आहेत. सांगायचं झालं तर पत्रलेखा आणि राजकुमार यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता दोघे त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात, शिवाय दोघे चहात्यांना कपल गोल्स देखील देतात.
राजकुमार राजकुमार राव याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता लवकरच अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या सोबत मिस्टर अँड मिसेस माही सिनेमात दिसणार आहे. मिस्टर अँड मिसेस सिनेमा अभिनेता क्रिटेटपटू महेंद्रसिंग धोनी याची भूमिका बजावताना दिसणार आहे, तर जान्हवी कपूर महिमा नावाच्या एका महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे