भन्साळी संतापल्यावर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्..; फरदीन खानने सांगितला किस्सा

| Updated on: May 09, 2024 | 2:41 PM

संजय लीला भन्साळींची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'हिरामंडी' ही वेब सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. भन्साळी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत आहेत.

भन्साळी संतापल्यावर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्..; फरदीन खानने सांगितला किस्सा
Sanjay Leela Bhansali
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांमधील भव्यदिव्य सेट, कलाकारांचे भरजरी पोशाख आणि अत्यंत बारकाईने डिझाइन केलेली प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. नुकतंच त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ‘हिरामंडी’ ही त्यांची वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख, रिचा चड्ढा, फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन यांसारख्या कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळते. IMDb ला दिलेल्या एका मुलाखतीत या कलाकारांनी दिग्दर्शक भन्साळींच्या स्वभावाविषयी बरंच काही सांगितलं.

सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीने सांगितलं की, भन्साळींना कुत्र्यांविषयी फार प्रेम आहे. याच मुलाखतीत फरदीन खानने एक किस्सा सांगितला. “जेव्हा कधी ते एखाद्या गोष्टीबद्दल चिडायचे किंवा संतापायचे, तेव्हा त्यांचे सहाय्यक दिग्दर्शक हिरामंडीच्या सेटवर 25 कुत्रे पाठवायचे. ज्याक्षणी हे कुत्रे सेटवर यायचे, त्याच्या दुसऱ्याच क्षणी ते अत्यंत शांत व्हायचे”, असं फरदीनने सांगितलं. त्यांच्याविषयी अशी एखादी गोष्ट जी सहसा लोकांना माहित नाही, ती कोणती असा प्रश्न अभिनेत्री संजीदा शेखला विचारण्यात आला होतं. तेव्हा तिने सांगितलं, “ते दिवसातून तीन ते चार वेळा त्यांचा कुर्ता बदलायचे आणि प्रत्येक वेळी जेव्हा ते कुर्ता बदलून यायचे, तेव्हा त्यांच्या डोक्यात नवीन विचार, नवीन कल्पना असायची.”

हे सुद्धा वाचा

या सीरिजमध्ये भन्साळींच्या भाचीनेही भूमिका साकारली आहे. शर्मिन सेहगल असं तिचं नाव असून तिनेसुद्धा शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. “आम्हाला एक सीन शूट करायचा होता, ज्यामध्ये मला रडायचं होतं. हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला चार दिवसांचा अवधी लागला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला रडायचं होतं. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजता शूटिंग संपेपर्यंत मी रडतच होती. चौथ्या दिवशी, माझे डोळे बटाट्यासारखे सुजले होते”, असं तिने सांगितलं.